करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी रोजगार वाढवण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकासा’साठी कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केली.
अर्थमंत्र्यांनी रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 2 लाख कोटी रुपयांच्या वाटपासह पाच योजनांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. त्या म्हणाल्या; यावर्षी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रोजगाराच्या घोषणेने होणारे फायदे –
अर्थमंत्र्यांनी सांगितले, की प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना (सर्व औपचारिक क्षेत्रात नवीन प्रवेश मिळालेला) एक महिन्याचा पगार दिला जाईल. दुसरे म्हणजे, उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी EPFO मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रोत्साहन दिले जाईल. यासोबतच कर्मचाऱ्यांना सर्व क्षेत्रातील अतिरिक्त रोजगार, ५० लाख लोकांना अतिरिक्त रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन योजना आखण्यात आली आहे.
पहिल्यांदा नोकरी शोधणारे (Union Budget 2024)
प्रथमच EPFO मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतच्या तीन हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण केले जाणार आहेत.
उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती
नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही त्यांच्या EPFO योगदानानुसार थेट प्रोत्साहन दिले जाईल.
नियोक्त्यांना समर्थन
दोन वर्षांसाठी प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्यांना त्यांच्या EPFO योगदानाची प्रति महिना 3,000 रुपये प्रतिपूर्ती केली जाईल.
10 लाखांपर्यंत आर्थिक मदत
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख (Union Budget 2024) रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृहे बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल; असेही त्या म्हणाल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com