करिअरनामा ऑनलाईन। पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर संशोधन करू इच्छिणाऱ्या (UGC PHD Regulations) उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच यूजीसीने PHD नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्यामध्ये काही आवश्यक अटी जोडण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हे नियम माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पीएचडीसाठी कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत याविषयी…
PHD च्या कालावधीमध्ये बदल
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएचडी अभ्यासक्रमाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यूजीसीने घालून दिलेल्या नियमांनुसार पीएचडी पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी किमान तीन वर्षांचा असेल. पीएचडी करणाऱ्या उमेदवाराला प्रवेशाच्या तारखेपासून जास्तीत जास्त 6 वर्षांचा कालावधी दिला जाईल.
महिलांसाठी विशेष सवलत (UGC PHD Regulations)
यूजीसीचे अध्यक्ष म्हणतात की यूजीसीच्या नवीन नियमांनुसार, विद्यार्थी लहान वयातच पीएचडी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. महिला पीएचडी आणि दिव्यांग उमेदवारांना 2 वर्षांची सूट दिली जाईल. यासोबतच कोणत्याही संस्थेत सेवा देणारे कर्मचारी किंवा शिक्षक अर्धवेळ पीएचडी करू शकतील.
कोण ठरणार अपात्र?
अशा शिक्षकांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा तीन वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना नवीन संशोधकांना त्यांच्या देखरेखीखाली घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु आधीच (UGC PHD Regulations) नोंदणीकृत संशोधकांचे मार्गदर्शन सुरू राहील.
असे आहेत नवीन नियम
यूजीसीच्या नियमांनुसार, पीएचडी संशोधकाने पुन्हा नोंदणी केल्यास, अशा परिस्थितीत त्याला जास्तीत जास्त दोन वर्षांचा कालावधी दिला जाईल. परंतु पीएचडी प्रोग्राम पूर्ण करण्याचा एकूण कालावधी पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश केल्याच्या तारखेपासून आठ वर्षांपेक्षा जास्त नसावा तर हे लागू होईल.
नोकरी करत करू शकता PHD
आतापर्यंत सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना संशोधन करण्यासाठी त्यांच्या विभागातून अभ्यास रजा घ्यायची होती, मात्र नवीन नियमानुसार सेवेत असलेले कर्मचारी किंवा शिक्षकही अर्धवेळ पीएचडी करू शकणार आहेत.
रिसर्च पेपर सबमिट करण्याची गरज नसणार (UGC PHD Regulations)
नवीन नियमानुसार आता ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणाद्वारे पीएचडी करता येणार नाही. आता पीएचडीच्या नव्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे म्हणजेच संशोधन प्रक्रियेदरम्यान दोन शोधनिबंध प्रकाशित करण्याची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com