करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET (UGC NET Exam 2024) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता या परीक्षेला बसणारे उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची आवश्यकता असेल. परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना हॉल तिकीटाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान प्रवेशपत्राची माहिती पोस्ट करण्यासोबतच, UGC अध्यक्षांनी नेट परीक्षेसाठी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. जगदीश कुमार यांनी UGC-NET साठी परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
UGC NET परीक्षा 2024
यूजीसी नेट जूनची परीक्षा दि. 18 जून रोजी घेतली जात आहे. एकूण 83 विषयांसाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR-आधारित पद्धतीने घेतली जाईल. सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ (UGC NET Exam 2024) संशोधन फेलोशिपसाठी भारतीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी UGC NET स्कोअर वापरला जातो. याशिवाय, NET पात्र उमेदवारांना भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश दिला जातो.
असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UGC NET Exam 2024)
1. सर्वप्रथम ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. यानंतर ‘UGC NET June 2024 Admit Card Download’ या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
4. यानंतर तुम्हाला UGC NET जून 2024 चे प्रवेशपत्र दिसेल.
5. प्रवेशपत्रावर दिलेला तपशील तपासा.
6. हॉल तिकीट डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com