UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याची खात्री झाल्यानंतर 18 जून रोजी घेलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. डार्कनेट, किंवा डार्क वेब, सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेरचा इंटरनेटचा एक छुपा भाग आहे, जेथे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात निनावी असतात आणि व्यवहार अनेकदा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी वापरून केले जातात.”

दोषींची गय केली जाणार नाही
NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने विशेषतः बिहारमध्ये राजकीय वादाला तोंड फुटले. या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, “या प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणाचीही गय केली जाणार (UGC NET 2024) नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तुरळक घटनांमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार तडजोड करणार नाही.

ते पुढे म्हणाले; “आम्ही NEET परीक्षेसंदर्भात बिहार सरकारच्या संपर्कात आहोत. आम्हाला या प्रकरणाशी संबंधित माहिती आणि तपशील मिळाले आहेत. याबाबत सविस्तर (UGC NET 2024) अहवालाची प्रतीक्षा आहे.” NTA आणि त्याच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशींवर सखोल चर्चा केली जाईल; असेही त्यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com