UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे.

असं डाउनलोड करा हॉल तिकीट
परीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रथम परीक्षा पोर्टलला भेट द्यायची आहे आणि नंतर मुख्यपृष्ठावर दिलेल्या लिंकवरून संबंधित डाउनलोड पृष्ठावर (UGC NET 2024) जाऊ शकता. येथे उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांचा तपशील भरून आणि सबमिट करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी त्यावर दिलेले त्यांचे वैयक्तिक तपशील (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इ.) तपासावेत. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास, दुरूस्तीसाठी शक्य तितक्या लवकर NTA हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

या तारखेला होणार परीक्षा (UGC NET 2024)
अधिकृत वेळापत्रकानुसार ही परीक्षा दि. 25 ते 27 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. या नियोजित तारखांना, परीक्षा दुपारी 9 ते 12 आणि नंतर दुपारी 3 ते 6 या सत्रात होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com