UGC Big Decision : PHD करताय!! ही बातमी तुमच्यासाठीच; ‘या’ विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीची गरज नाही

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । PHD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC Big Decision) म्हणजेच UGC ने पीएचडीसाठी मास्टर्स डिग्री असण्याची अट रद्द केली आहे. पीएचडी प्रोग्रामसाठी यूजीसीने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता 7.5 सीजीपीएसह 4 वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी पीएचडीला प्रवेशासाठी पात्र असतील. पीएचडी पदवीबाबत यूजीसीने नुकतेच नवीन नियम जारी केले आहेत. त्यामध्ये हा नियम समाविष्ट करण्यात आला आहे.

चार वर्षांच्या अंडरग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये 10 पैकी किमान 7.5 सीजीपीए मिळवलेले विद्यार्थी आता थेट पीएचडीला प्रवेश घेऊ शकतील. आता त्यांना पीएचडीच्या प्रवेशासाठी पदव्युत्तर पदवी म्हणजेच मास्टर्स डिग्री घेण्याची गरज भासणार नाही. पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या नवीन (UGC Big Decision) नियमामुळे हे शक्य होणार आहे. प्रीडेटरी जर्नल्समध्ये प्रकाशित करण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी नव्या नियमांमध्ये पेटंट घेण्याला किंवा पीअर-रिव्ह्यू केलेल्या किंवा रेफर्ड जर्नल्समध्येच प्रकाशित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

यूनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन रेग्युलेशन 2022 हे धोरण (UGC Big Decision) जूनच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या 2022-23 शैक्षणिक सत्रात त्याची अंमलबजावणी होऊ शकते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या FYUP ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे. FYUP म्हणजेच चार वर्षांच्या किंवा आठ सेमिस्टर्सच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना पीएचडीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर पदवीला किमान 7.5/10 CGPA असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC, तसंच दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या उमेदवारांसाठी 10 स्केलवर 0.5 CGPA स्कोअरची सूट दिली जाईल.

UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार म्हणाले, “आमच्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च इकोसिस्टीम सुधारण्यासाठी चार वर्षांची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी CGPA 7.5/10 किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. तसंच ज्यांचा सीजीपीए 7.5 पेक्षा कमी आहे, त्यांना प्रवेशासाठी एक वर्षाची पदव्युत्तर पदवी घ्यावी लागेल.”

नवीन नियमांनुसार, रिक्त जागांपैकी 40 टक्के जागा विद्यापीठ स्तरावरच्या चाचणीद्वारे भरल्या जातील. सध्या प्रवेशासाठी दोन पद्धती सुचवल्या आहेत. पहिली म्हणजे 100% प्रवेश राष्ट्रीय स्तरावरच्या (UGC Big Decision) प्रवेश परीक्षेनुसार दिला जावा. दुसरा पर्याय 60-40% असा आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा (Entrance Exam) आणि विद्यापीठ स्तरावर किंवा राज्य स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु राष्ट्रीय स्तर UGC, CSIR, ICMR, ICAR यांच्यातर्फे प्रवेश परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सर्व जागा भरल्या गेल्यास, अशा उमेदवारांची निवड मुलाखत/व्हायव्हासह 100 टक्के वेटेज तयार केलेल्या मेरिट लिस्टद्वारे केली जाईल, असंही त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com