Twitter Elon Musk : Layoff नंतर ट्विटरने उघडली दारे; एलॉन मस्क यांनी केली ‘ही’ अजब घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति एलॉन मस्क यांनी (Twitter Elon Musk) ट्विटरची मालकी मिळविल्यानंतर जो काही गोंधळ घातला की, अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले. ट्विटरमध्ये तर काही जणांनी तर अवघ्या काही दिवसांची सेवा बजावली होती. पण मस्क यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखव ला. त्याच मस्क यांनी आता ट्विटरचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत..

तर मस्क यांच्या निर्णयामुळे ट्विटरमधील 7500 कर्मचाऱ्यांपैकी 2700 कर्मचारीच उरले. हा ताण असह्य होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी एका मीटिंगमध्ये सामुहिक राजीनामे (Twitter Elon Musk) दिले. त्यामुळे मस्क यांचा पारा एकदम उतरला.

मस्क यांनी ट्विटरचा डोलारा सांभाळण्यासाठी कर्मचारी भरतीला हिरवा कंदिल दाखविला आहे. मस्क यांनी कंपनीत एंट्री केल्यापासून मोठ्या पदावरील अनेक दिग्गजांना फटका बसलेला असताना, आता मस्क यांनी कर्मचारी भरतीचा बिगूल वाजवला आहे.

मीडिया अहवालानुसार, सोमवारी मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानुसार इंजिनिअरिंग आणि मार्केटिंग पदासाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांना या पदासाठी मित्रांच्या नावाची शिफारसही करता येणार आहे.

अजून भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली (Twitter Elon Musk) नाही. ट्विटरच्या संकेतस्थळावर या भरतीविषयीची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, कर्मचाऱ्यांमध्ये या भरतीची माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मस्क हे ट्विटरचे मुख्य कार्यालय टेक्सासमध्ये सुरु करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी टेस्ला कंपनीच्या बाबतीत हाच निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ट्विटरच्या कार्यालयाविषयी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com