करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुणांना आपले करिअर (Top 10 Law Colleges in maharashtra) समाजात उच्च स्थानावर नेऊन ठेवायचे आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांत दिवसागणिक वकिलांची आवश्यकता भासत आहे. तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे का? चला तर… लॉचं म्हणजेच कायद्याचं शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था, आवश्यक कौशल्य आणि संधी याविषयी आज आपण जाणून घेऊया….
वकिली क्षेत्रात पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी
कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची. खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही, तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर (Top 10 Law Colleges in maharashtra) अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. दिवाणी किंवा नागरी आणि फौजदारी गुन्ह्यांमध्ये वकील आपल्या पक्षकाराची बाजू न्यायालयात मांडतात. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात.
‘या’मध्ये करता येईल स्पेशलायझेशन
कायदेशीर प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा न्यायालयापुढे आपल्याला गरज भासते ती आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाची. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना वकिलाकडे कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचा खास अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन (Top 10 Law Colleges in maharashtra) करायला हवं. तुम्हाला नागरी, फौजदारी, सायबर, प्रशासकीय, मानव अधिकार, संवैधानिक, कौटुंबिक, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट, टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय, व्यापार, लेबर, बौद्धिक संपदा (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी)/ पेटंट आदींपैकी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून स्पेशलायझेशन करता येईल. वकील म्हणून काम करताना (प्रॅक्टिस करताना) स्टेट सेंट्रल बार काऊन्सिलकडे नावनोंदणी करून मान्यता मिळवावी लागते.
असा असतो अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण (Top 10 Law Colleges in maharashtra)
कायदा क्षेत्रातील पदवी मिळवायची असेल तर ‘लॉ कोर्स’ करायला हवा. यासाठी विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय आहेत. एक तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीनंतर तीन वर्षांचा लॉ कोर्स (एलएलबी) करणे किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा बीए एलएलबी (ऑनर्स) अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पदवी मिळवता येते. ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात कायद्याचे काम (प्रॅक्टिस) करण्याची इच्छा नाही, असे विद्यार्थी दोन वर्षांचा करस्पॉन्डन्स कोर्स करू शकतात. पदवीनंतर (ग्रॅज्युएशन) दोन वर्षांचा बॅचलर ऑफ जनरल लॉ (बीजीएल) किंवा बॅचलर ऑफ अकॅडमिक लॉ (बीएल) हा अभ्यासक्रम करण्याचा पर्याय अशा विद्यार्थ्यांना निवडता येईल.
इथे मिळते रोजगाराची संधी
कायद्याची पदवी मिळवलेल्या अर्थात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वकिलांना ट्रायल कोर्ट (सत्र न्यायालय), हाय कोर्ट (उच्च न्यायालय), सुप्रीम कोर्ट (सर्वोच्च न्यायालय) आणि कॉझी जुडिशिअल इन्स्टिट्यूशन्समध्ये वकील म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. इंडियन लीगल सर्व्हिस (भारतीय कायदेविषयक सेवा) तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमध्येही पदवीधर वकिलांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.
टीचिंग, कायदेविषयक पुस्तकं/ जर्नल्स/ रिपोर्ट्स यासाठी लेखन आणि संपादन, कायदेविषयक ज्ञानाचे आऊटसोर्सिंग, भारतीय लष्कर, नौदल आणि वायू दलाच्या कायदेविषयक (Top 10 Law Colleges in maharashtra) शाखांमध्ये किंवा विविध ट्रस्टवर ट्रस्टी म्हणूनही काम करण्याची संधी प्रशिक्षित वकिलांना मिळू शकते.
‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 लॉ कॉलेजेस –
- गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
- सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर
- नंदुरबार विधी महाविद्यालय, नंदुरबार (Top 10 Law Colleges in maharashtra)
- आय.एल.एस. विधी महाविद्यालय, पुणे
- डीईएस विधी महाविद्यालय, पुणे
- श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी
- यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे
- शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय
विधी महाविद्यालय (शारदा भवन शिक्षण संस्था, नांदेड)
राज्यातील अन्य लॉ कॉलेजेस –
- सिंबायोसिस विधि महाविद्यालय, पुणे
- डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
- के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
- न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
- रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
- जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे. (Top 10 Law Colleges in maharashtra)
- जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
- चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
- नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
- व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर.
- गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई www.glcmumbai.com
- किशनचंद छेलाराम लॉ कॉलेज, मुंबई www.kclawcollege.co
- न्यू लॉ कॉलेज, मुंबई
इंटर्नशिप्स करण्याचे फायदे
कायद्याचं शिक्षण घेत असताना, वकील म्हणून पदवी मिळवताना शक्य होईल तेवढ्या इंटर्नशिप्स करत राहायला हव्यात. यामुळे वकील म्हणून स्वतंत्र काम सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला या क्षेत्रात कसं काम करायचं, प्रत्यक्ष काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदी बाबींची कल्पना येईल. इंटर्नशिप करताना तुम्हाला आपण कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करायला हवं, याचा अंदाज बांधता येणं (Top 10 Law Colleges in maharashtra) शक्य होईल. काही लॉ फर्म्स योग्य उमेदवारांना प्री प्लेसमेंट्स देतात. एक यशस्वी वकील म्हणून स्वत:ची ‘इमेज’ तयार करण्यासाठी अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या करायला लागते, त्यामुळे संयम ठेवून आपलं काम सातत्याने करायला हवं; असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com