Top 10 Colleges for Mass Communication : Mass Communication साठी ‘ही’ आहेत टॉप 10 कॉलेजेस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मास कम्युनिकेशन हे आव्हानात्मक (Top 10 Colleges for Mass Communication) क्षेत्र समजलं जातं. सध्या मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. खरंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी सातत्यानं अलर्ट राहणं, तुमचं सामान्य ज्ञान उत्तम असणं, कायदा, प्रशासनाविषयी किमान प्राथमिक माहिती असणं, तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करता येणं आवश्यक असतं. सध्याचं युग हे जसं माहिती तंत्रज्ञानाचं आहे तसंच ते स्पेशलायझेशनचं युग आहे. एखादया विषयाचा सखोल अभ्यास करण्याची तयारी किंवा त्या विषयात पारंगत असणं ही बाब तुमचे या क्षेत्रातील करिअर अधिक भक्कम करते.

मास कम्युनिकेशन किंवा जर्नालिझम –
या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्यांसाठी लेखन आणि विवेचनशैली उत्तम असणं महत्वाचं असतं. मास कम्युनिकेशन (Mass Comunication) किंवा जर्नालिझम (Journalism) क्षेत्रात कामाची वेळ निश्चित नसते. इथे अनेकदा वेळेपेक्षा जास्त काळ काम करावं लागतं, त्यादृष्टीने मानसिक तयारी असणं हे देखील या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाचं ठरतं. इयत्ता 12 वी नंतर मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण करुन अनेकजण माध्यम क्षेत्रात करिअर करु इच्छितात. खरं तर हा अभ्यासक्रम ऑफर करणाऱ्या महाविद्यालये, इन्स्टिट्यूटची संख्या देशात कमी नाही. आज आम्ही तुम्हाला मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमासाठी टॉप 10 कॉलेजेसची माहिती देत आहोत. जर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही विचार करत असाल तर या कॉलेजेसची माहिती नक्की जाणून घ्या.

देशातील टॉप 10 इन्स्टिट्यूट्स – (Top 10 Colleges for Mass Communication)
1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली (Indian Institute of Journalism and New Media, New Delhi)
2) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली (Jamia Millia Institute of Mass Communication Research Center, New Delhi.)
3) माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी, भोपाळ (Makhanlal Chaturvedi University, Bhopal)
4) सिंबायोसिस इन्स्टिटयूट ऑफ कम्युनिकेशन, पुणे (Symbiosis Institute of Communication, Pune)
5) मणिपाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ कम्युनिकेशन, मणिपाल (Manipal University School of Communication, Manipal)
6) बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, बनारस (Banaras Hindu University, Banaras)
7) अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगड (Aligarh Muslim University, Aligarh)
8) कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी (Kurukshetra University)
9)झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, मुंबई, (Xavier Instutute of Mass Communication, Mumbai)
10) दिल्ली युनिव्हर्सिटी (Delhi University)

काय आहे आवश्यक पात्रता –
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (Top 10 Colleges for Mass Communication) कोणत्याही शाखेतून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण करु शकता.

इथे मिळते नोकरीची संधी (Top 10 Colleges for Mass Communication)
जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी टिव्ही न्यूज चॅनेल (News Channels), वृत्तपत्रे (News Papers), ऑनलाइन मिडिया, पब्लिक रिलेशन एजन्सीज (PRO Agencies) किंवा जाहिरात एजन्सीजमध्ये जॉब करु शकता. या व्यतरिक्त कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये क्लाएंट रिलेशनशीप मॅनेजर म्हणून देखील नोकरी मिळू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com