करीअरनामा । वेळेचे व्यवस्थापन ही विशिष्ट कामांवर किती वेळ घालवायचा याचं नियोजन आणि नियंत्रित करण्याची प्रक्रिया होय. चांगले वेळेचे व्यवस्थापन एखाद्या व्यक्तीस कमी कालावधीत अधिक पूर्ण करण्यास सक्षम करते, तणाव कमी करते आणि करियरच्या यशाकडे वळवते.
त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे झाले आहे. नको असलेल्या गोष्टी करणे टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे.
सध्या करोना विषाणु महामारीने सार जग हैरान झाल आहे. अनेक मोठमोठ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था ह्या कोलमंडल्या आहेत. त्यामुळे अशा अघोषित आर्थिक आणीबाणी मध्ये स्वतःला सिद्ध करायचे असेल व आपले करीअर उत्तम ठेवयचे असेल तर तर आपण आता वेळेचे व्यवस्थापन केलेले कधी पण महतत्वाचे ठरेल.
आज संपूर्ण जग काही काळासाठी तरी थांबले आहे. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा ह्या मिळालेल्या वेळेचा फायदा जो करेल, त्यालाच महामंदी संपल्यानंतर याचा फायदा होईल. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.
तर आपण आता बघुयात की वेळेच्या व्यवस्थापनासाठी काय केले पाहिजे ते –
१) लॉकडाउन मध्ये तुमचा जॉब थांबला असेल, तरी आपण आपल्या कामाचे व अध्ययनाचे वेळ ठरवून घ्या. जेणे करुण ह्या वैश्विक महामारी मधून बाहेर पडल्यावर तुम्हाला सोनेरी दिवस येतील.
२) आता पर्यंत जे काम करीत होता त्यातून तुम्ही काय काय शिकलात, स्वतःला किती ज्ञान मिळाले व अजून आपल्याला यात काय काय शिकायचे आहे , त्यांचे मूल्यमापन करा.
3) लॉकडाउन काळात तुमचा जॉब गेला असेल तरी स्वतःला दोष देऊ नका. घरात सुरक्षित राहून एखादी ऑनलाइन कोर्स द्वारे तुम्हाला काही अतिरिक्त शिकता येईल का त्याबाबत विचार करा. यामुळे वेळेच सदुपयोग नक्की होईल.
4) सर्वात महत्वाचे आपण ह्या टाळेबंदीचा उपयोग स्वतःला घडविण्यासाठी करावा. कारण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. जेवढा वेळ आता निवांत भेटला आहे त्याचा पुरेपूर फायदा घेत आपण स्वतःला नक्की घडविले पाहिजे.
5) काम फारच अशक्य असेल; तर अर्धे-अर्धे काम संपवा.
6) कामात गती नसेल तर आपले वेळापत्रक बदला.
7) सध्या वर्क फ्रॉम होम जॉब झाले आहेत. कार्ये आणि मीटिंग्ज दरम्यान बफर टाइम सोडा.
8) प्रत्येक कामात परिपूर्ण होण्याचा अट्टहास थांबवा.
9) गरज नसलेल्या गोष्टींना व व्यक्तींना फक्त “नाही” म्हणायला शिका.
10) प्रतीक्षा करण्यात वेळ वाया घालवू नका.
11)सदैव प्रेरणा मिळवित रहा.
12) टाईम ऑडिट करा.
13) प्रत्येक कामाची मुदत निश्चित करा.
14) करण्याच्या-कामांची यादी वापरा, पण कामे सोडू नका.
15) तुमची सकाळची वेळ महत्वाच्या कामांवर खर्ची करा.