करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Old Pension Scheme) देणारी बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांना देण्यात आली आहे. याबाबत सोमवारी बैठक झाली; या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेशी निगडित सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर जुन्या पेन्शन योजनेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले? (Old Pension Scheme)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ 1 मार्च 2024 पासून मिळणार आहे; असे देखील आदेश निघाले आहेत. त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे 4 टक्के महागाई भत्ता देखील वाढ होण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम 20 वर्षांनी पुर्नस्थापित करण्यात येईल; असे देखील सांगण्यात आले आहे.
बाल संगोपन रजा वाढवून देणार, सेवानिवृत्ती उपदान 25 लाख करण्याचा प्रस्ताव
राज्य सरकारच्या झालेल्या या बैठकीमध्ये सेवानिवृत्त उपदान 14 लाख ऐवजी 25 लाख रुपये निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील (Old Pension Scheme) रिक्त पदे देखील भरण्यात येणार आहेत. तसेच कामासाठी आगाऊ वेतन वाढ देण्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसेच सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता बाल संगोपनाची रजा वाढवून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com