करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभर (TET Scam Maharashtra) गाजलेल्या TET प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. TETमध्ये गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मधील 1 आणि 2019 मधील 75 अशा एकूण 76 शिक्षकांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. शिक्षकांचा TET प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हे 76 शिक्षक गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 2013 ते 2019 या कालावधीतील सर्व प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात 2013 नंतर लागलेल्या शिक्षकांकडील TET उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने मागविले होते. ज्यामध्ये बीड जिल्ह्यात 115 प्राथमिक आणि 35 माध्यमिक शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र (TET Scam Maharashtra) संबंधित शाळांनी सादर केल्यानंतर ते राज्य पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये अनेकजण अपात्र ठरले होते. तर या प्रकरणी पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरमार्गाने पास केल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील 75 शिक्षक, उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवली असून संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या शिक्षकांची यादी संबंधित संस्थेला पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या उमेदवारांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र रद्द (TET Scam Maharashtra)
प्रतीक्षा वाघ, रमाबाई जाधव, कौस्तुभ शिंदे, शिल्पा गित्ते, उज्मा फातेमा फारूक बेग, अर्शद राशीद सय्यद, हुमेरा बानू आझम हुसेन शेख, हुस्ना यास्मिन शेख हमीद, पूजा मस्के, संतोष आडे, पूजा कांबळे, परमेश्वर राठोड, सीमा रुद्रे, अजय जाधव, परहा यास्मिन जहिरोद्दीन, फौजिया नुरुलहसन (TET Scam Maharashtra) लाहोरी, अतियाबेगम शेख मुस्तफा, आस्मा सय्यद मोहम्मद सिद्दीकी, सोबिया फरहा कादरी सय्यद जमिरोद्दीन कादरी, बीबी हजेरा शेख साजेद, असफिया परवीन मोहम्मद अब्दुल बासेत, निशात आरजुमंद इजहार मझरोद्दीन, शामिका रंजवण, मीना टिके, ऊर्मिला वाडे, मुक्ताबाई सोगे, प्रशांत कुलकर्णी, अमोल पाटोळे, द्रौपदी सानप, सविता घाडगे, सुनीता देवकते, वर्षाराणी निरडे, मुजाहिद खलील, अब्दुल हमीद मोमीन, युसूफ शेख, मो. शेख, शाझिया बेगम मो. अब्दुल सत्तार, यास्मिन बेगम स. अब्दुल कादर, उम्मेसायमा वहाजोद्दीन अन्सारी, गणेश चारकळे, ज्योती काळे, झिशान हमीद शेख, यास्मिन बेगम झिया अहमद सिद्दीकी, मोहम्मद खान, चांदखान पठाण, शहनाझ बेगम नजीर शेख, कौसर नवाजखान पठाण, सविता पवार, प्रणिता कुलकर्णी, निलोफर काझी, अदनान अहमद अनिस खान पठाण, फैजोद्दीन रिझवानोद्दीन शेख, अलिया बेगम राषख सलीम, मुद्दसीर मेहराज शेख, शाहीन बेगम बशीरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुख्तार अहमद सय्यद, शाझियातस्किन मोहम्मद (TET Scam Maharashtra) मुनिसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीनबेगम रहिमोद्दीन खान कॉसर बेगम शकीलखान, सलाम मुख्तार अब्दुल, इरफान गमील दायमी सईद, मो. मोडनोद्दीन मो. मोइजोद्दीन सिद्दीकी, अकेबअली अमानतअली सय्यद, आदिल आयुब सय्यद, शैलेश कसबे, कावेरी सानप, आयशा ताजिन फारूख शेख, सुहासिनी घोबाळे, विकास लोंढे, विश्वास काळे, उज्मा समितान खिजरुन कादरी, सुप्रिया नराळे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com