करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (TET Exam 2024) घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे; अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात TET ऑनलाइन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या कार्य पद्धतीवर संशय निर्माण झाला होता. परिणामी अनेकांना नोकरीपासून वंचित रहावे लागले आहे. यापुढे गैरव्यवहार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु केली आहे.
गेल्या दोन वर्षांत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात (TET Exam 2024) आली नाही. मुळातच टीईटी परीक्षेत अनेक बोगस उमेदवार सापडले असताना त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई केली गेली नाही. दरम्यान शासन जानेवारी महिन्यात अधिसूचना जाहीर करून फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com