करिअरनामा ऑनलाईन। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओने नुकतीच (Tech Jobs) राजस्थानमध्ये 5G नेटवर्क वर आधारित वाय-फाय सेवा सुरु केली. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी नाथद्वारा 5G सेवा सुरु केली. टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि वाराणसी या शहरातही 5G सेवेचा शुभारंभ केलेला आहे.
अशा निर्माण होणार संधी (Tech Jobs)
तुम्हाला प्रश्न पडला असेल, की 5G मुळे मुलं अजून मोबाईल आणि लॅपटॉपला घट्ट चिटकून बसतील; तर हा अंदाज एकदम चुकीचा आहे. कारण केवळ मनोरंजनासाठीच 5Gचा वापर होणार नाही.
5G मुळे देशात रोजगाराची नवी दालने उघडणार आहेत. कुशल तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. या सेवेमुळे अनेक क्षेत्रात क्रांती येणार आहे. तंत्रज्ञान आले म्हणून नोकऱ्या (Tech Jobs) जाणार नसून अनेक नवीन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे.
देशात 5G सेवेमुळे मोबाईलमध्ये इंटरनेटचा झंझावात येईल. सोबत नोकऱ्यांचा पाऊसही पडेल. सुरुवातीच्या टप्प्यातच देशात जवळपास 80 हजार जणांना थेट नोकऱ्या मिळतील असा दावा करण्यात येत आहे.
टेलिकॉम सेक्टरमध्ये थेट नोकरीसोबतच अप्रत्यक्ष रोजगारही मिळतील. मोबाईल टॉवर, मोबाईल हँडसेट्स, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, 5G सिक्योरिटी, सायबर सिक्योरिटी यासह इतर क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होतील.
सरकारच्या अंदाजानुसार, 5G मुळे देशात नोकरीच्या (Tech Jobs) भरपूर संधी उपलब्ध होतील. टेलिकॉम कंपन्या पुढील 2 ते 3 वर्षांत जवळपास 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात 80 हजार नागरिकांना थेट रोजगार प्राप्त होईल.
ग्लोबल जॉब वेबसाइट इन्डीड (Indeed) च्या दाव्यानुसार, टेलिकॉम सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरात नोकऱ्यांमध्ये 33 टक्के वृद्धी झाली आहे. 5G मुळे 2040 पर्यंत 450 अरब डॉलरची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com