Teachers Megabharti : आनंदाची बातमी!! लवकरच राज्यात होणार शिक्षकांची बंपरभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी (Teachers Megabharti) राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला होता. आता राज्यात शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली.
किती शिक्षकांची भरती होणार
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 30,000 शिक्षकांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेत सध्याच्या आरक्षणाचे नियम पाळले जातील. भरतीसाठी मुलाखतीही घेण्यात येतील. राज्य शालेय शिक्षण (Teachers Megabharti) विभागाकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. आम्ही या वर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करु; असा दावाही त्यांनी केला.

भरतीचा दुसरा टप्पा (Teachers Megabharti)
दुसऱ्या टप्प्यात आणखी 20,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीनंतर दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची भरती करायची आहे, याचा निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
इतकी पदे रिक्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातो. आता त्यातील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण (Teachers Megabharti) कमी होणार आहे.
केंद्र सरकार आदिवासी समुदायाच्या विकासासाठी 740 एकलव्य मॉडल स्कूल स्थापन केले जाणार आहेत. 38 हजार 800 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल डिजीटल लायब्ररीसह काही योजना जाहीर केल्या. यात प्रामुख्याने 740 एकलव्य मॉडलच्या स्कूल सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com