WhatsApp Group
Join Now
मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, राज्यात लवकरच तलाठी भरती जाहीर करेल असे आश्वासन ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांना दिले.