करिअरनामा ऑनलाईन । भूमी अभिलेख (Talathi Bharti Exam 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि (Talathi Bharti Exam 2023) सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा (Talathi Bharti Exam 2023) घेण्यात येणार आहे; अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.
असे आहेत परीक्षेचे टप्पे – (Talathi Bharti Exam 2023)
१. पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
२. दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
३. तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
४. २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com