करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल लागून दिड (Talathi Bharti) महिना झाला आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांना 15 दिवसात नियुक्ती मिळण्याची अपेक्षा असते; परंतु आता जवळपास दिड महिना उलटून गेला तरीही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पेसा क्षेत्रातील निकालही अजून लागला नाही. याबाबत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महसूल विभागाला निवेदन दिले आहे. तलाठी भरतीतील अनेक उमेदवार इतर परीक्षेतही निवड झाले आहेत ते सुरक्षिततेसाठी तिथेही जागा अडवत आहेत. अशातच समोर येऊ घातलेल्या लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सर्वांना नियुक्त्या मिळाव्यात; अशी मागणी जोर धरत आहे.
राज्य शासनाने पेसा क्षेत्र वगळून तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पेसा भागात येणाऱ्या उमेदवारांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र,उर्वरित भरती प्रक्रिया सुरू केली असून केवळ नियुक्ती देण्याची प्रक्रिया बाकी आहे. तरीही तलाठी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती का दिली जात नाही; याबाबत उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यास नियुक्त्या लांबणार आहेत. त्यामुळे अनेक उमेदवार याबाबत शासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत.
पेपर फूटीच्या घटनांमुळे तलाठी भरती वादात सापडली असल्याचे बोलले जात होते. मात्र,राज्य शासनाने निकाल जाहीर करून उमेदवारांची निवड यादी जाहीर केली. तसेच (Talathi Bharti) सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली. मात्र,अद्याप उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. आता पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या द्याव्यात,अशी मागणी तलाठी भरतीत निवड झालेल्या उमेदवारांकडून केली जात आहे. परंतु, तलाठी भरतीत गोंधळ झाल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायायलात याचिका दाखल केली आहे. येत्या मंगळवारी (दि.5 मार्च) त्यावर सुनावणी होणार आहे. परिणामी तलाठी पदावरील नियुक्त्या लांबणार,असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बहूचर्चित तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला, असा आरोप करत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयात याचिका दाखल केली.तत्पूर्वी पेपर पुटीचे अनेक पुरावे शासनाकडे सादर करण्यात आले.तसेच पोलिसांनी सुध्दा याबाबत गुन्हे दाखल केले आहेत.त्यामुळे भरती रद्द करून पुन्हा भरती घ्यावी,अशी मागणी (Talathi Bharti) समन्वय समितीकडून केली जात आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी असून शासनाला त्यावर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.त्यामुळे शासन यावर काय बाजू मांडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com