करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार पदे भरली जाणार आहेत. या भरतीचे आदेश राज्य सरकारने यापूर्वी काढले आहेत. तलाठी भरतीच्या माध्यमातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत.
राज्याच्या विविध सरकारी विभागांत अनेक वर्षांपासून ‘गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तलाठ्यांची पदे वाढण्याची शक्यता असून, सध्या 4 हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेस सरकारने मान्यता दिली आहे.
लवकरच जाहीर होणार भरतीचा कार्यक्रम (Talathi Bharti 2023)
राज्य सरकारने महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी नियुक्त केलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांकडून रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा लवकरच घेतली जाणार असून, त्यासाठी कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर होणार आहे. भरतीसाठी (Talathi Bharti 2023) आवश्यक जाहिरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. परीक्षेसाठी निवड केलेल्या कंपनीसोबत पद भरतीबाबत सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांकडून पदभरती संबंधी आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक पदभरती संबधित इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यात येतील.
तलाठी भरतीसाठी वय मर्यादा –
अर्ज करताना उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
मिळणारे वेतन –
तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,200 रुपये ते 20 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे.
महत्वाची सूचना – (Talathi Bharti 2023)
यासाठी जानेवारी २०२३ पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करताना उमेदवारांना G Mail अकाऊंटची मदत घ्यावी लागेल. पूर्ण अर्ज भरल्यावर अर्जाची प्रिंट देखील G Mail उपलब्ध होणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर – CLICK
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com