Talathi Bharti 2023 : राज्यात लवकरच सुरु होणार तलाठ्यांची मेगाभरती; 4644 पदांची जाहिरात प्रसिद्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांना प्रतीक्षा लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. राज्याच्या महसूल विभागाने आज राज्य सरकारने घोषित केलेल्या 75 हजार मेगा भरतीमधील तलाठी पदाच्या तब्बल 4644 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता बहु प्रतीक्षेनंतर तलाठी पदभरती मोठया संख्येत होत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विविध जिल्ह्यांतील तलाठी पदाची एकूण 4,644 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी १७ ऑगस्ट ते 12 सप्टेंबर2023 दरम्यान परीक्षा घेण्यात (Talathi Bharti 2023) येणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अन्यथा अर्ज होईल बाद
भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची लिंक खुली करण्यात येणार आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता (Talathi Bharti 2023) येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील, याची नोंद घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण तसेच अमरावती या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील तलाठ्यांच्या 4 हजार 664 पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही आहे परीक्षेची संभाव्य तारीख (Talathi Bharti 2023)
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी, यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे.

तलाठी भरती 2023: जिल्हा निहाय जागा

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com