करिअरनामा ऑनलाईन । महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती (Talathi Bharti 2023) टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू केली असल्याचे स्पष्ट केले आहे. या माध्यमातून 4 हजार 681 जागा भरण्यात येणार आहेत. मात्र ही भरती प्रक्रिया केव्हा पार पडेल याबद्दल स्पष्ट समजू शकले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरली जातील.
दरम्यान बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण (Talathi Bharti 2023) माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करुनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. शासन निर्णय जाहीर झाल्याने ही रखडलेली भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे
तलाठी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Talathi Bharti 2023)
1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
3. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
4. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
तलाठी भरतीसाठी असा करा अर्ज
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जदाराचे स्वतःचे gmail account असणे आवश्यक आहे. (Talathi Bharti 2023)
3. अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
4. अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
5. सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जासह उपस्थित असणं आवश्यक आहे.
राज्यातील विभागनिहाय पदे –
नाशिक – 803 पदे
औरंगाबाद – 799 पदे
कोकण – 641 पदे (Talathi Bharti 2023)
नागपूर – 550 पदे
अमरावती – 124 पदे
पुणे – 702 पदे
अशी होणार परीक्षा –
1. तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात.
2. परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
3. तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
4. परीक्षेचा कालावधी 02 तास आहे. (Talathi Bharti 2023)
5. प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
अधिक माहितीसाठी संपर्क – (Talathi Bharti 2023)
Postal Address: Maharashtra Mahsul & Van Vibhag, 1st Floor (Main Building), Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032
Helpline Number – 1800-3000-7766 (Mon-Sat 08:00 AM to 09:00 PM)
Official Email ID for Query – [email protected]
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com