Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी कसा आणि कुठे करायचा अर्ज? पहा पात्रता, पदे, पगार, परीक्षा फी आणि सर्व डिटेल्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागाकडून तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, आवश्यक पात्रता, पगार, जिल्हानिहाय पदे किती आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

विभाग – महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नाव – तलाठी
पद संख्या – 4644 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 26 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत
परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत

अर्ज फी – (Talathi Bharti 2023)
खुला प्रवर्ग – 1000/- रुपये
मागास प्रवर्ग – 900/- रुपये
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
पात्रता –
तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
2. संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. (Talathi Bharti 2023)
3. उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
4. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना राज्य शिक्षण मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

असे आहे तलाठी भरती परीक्षेचे स्वरुप –
1. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
2. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील.
3. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील.
4. लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
5. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराला एकाच (Talathi Bharti 2023) जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल.
3. दिलेल्या मुदतीत परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Talathi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन फॉर्म – Form

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in
परीक्षेसंदर्भात महत्वाचे –

परीक्षेची तारीख आणि कालावधी mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com