करिअरनामा ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Suspension of Recruitment) अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान आणि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरुपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे; असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
महत्वाचे – (Suspension of Recruitment)
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना कळविण्यात येतील. तसेच (Suspension of Recruitment) भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल; असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com