करिअरनामा ऑनलाईन।आयुष्यात घेतलेले छोट्यात छोटे निर्णय आपल्या (Success Tips ) करिअरवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो. पण निर्णय घेताना आपण द्विधा मनस्थितीत असतो. अशावेळी नेमकं कोणत्या बाजूचं ऐकायचं हे आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही देखील अशा गोंधळून गेलेल्या मनस्थितीत असाल तर ५ महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फॉलो केलात तर तुम्ही लवकरच स्वत:ला करिअरमध्ये यशस्वी झालेले पहाल.
‘या’ टिप्स करा फॉलो –
1. आंतर्मनाचा आवाज ऐका (Success Tips)
कोणताही निर्णय घेताना सर्वप्रथम तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. या आधारावर घेतलेले निर्णय दीर्घकालीन प्रभाव पाडतात. विशेषतः वैयक्तिक जीवनातील मोठे निर्णय जसे की लग्न, नोकरी, करिअर इ. अशावेळी आपण आपल्या अंतर्मनाला साद घालावी.
2. आंतर्मनाच्या आवाजाचे विश्लेषण करा
आता तुमच्या ‘आतल्या आवाजाचे’ विश्लेषण करा. विचारा की मी असा विचार का करतो, मला हे का हवे आहे किंवा मला हे का नकोय? जर आपण भूतकाळातील (Success Tips) अनुभवांवर आधारित निर्णय घेत आहोत, तर बाह्य परिस्थिती अजूनही तशीच आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधा.
3. अपयशाच्या कहाण्या यशस्वी करिअरची सुरुवात करतात
आता उपलब्ध माहितीच्या निकषावर तुमचा निर्णय तपासा. उदाहरणार्थ, तुम्ही सचिन तेंडुलकरला आयुष्यात तुमचा आयडॉल मानत असाल तर त्याने रचलेल्या इतिहासाकडेच केवळ पाहत राहू नका. त्याने घेतलेले प्रचंड परिश्रम, त्याचा संघर्ष, तडजोड देखील पाहा. शेकडो अपयशाच्या कहाण्या या यशस्वी करिअरची सुरुवात करुन देतात.
4. घाई करणे टाळा
कोणताही निर्णय घेताना स्वत:ला वेळ द्या. घाई करणे (Success Tips) हे चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अनावश्यक घाई करू नका आणि पूर्ण वेळ घ्या आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या.
5. स्वतःनिर्णय घ्या, त्याची जबाबदारी स्वीकारा
बहुतेक जण चुकीच्या निर्णयाला इतरांना जबाबदार धरतात. हे अत्यंत चुकीचे आहे. घेतलेल्या निर्णयामध्ये जर अपयशी ठरलात तर दुसर्याला दोष देऊ लागतात. हे दुर्बलतेचे लक्षण आहे. काहीही झाले तरी तुमचा निर्णय ‘पूर्णपणे स्वतःचा’ असेल, त्याची जबाबदारी देखील स्वत:ची असेल याची खात्री करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com