करिअरनामा ऑनलाईन। कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी (Success Tips) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच साम्य दिसून येतं. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण या लेखातून जाणून घेवूया..
1. एकाग्रता (Concentration)
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून हि एकाग्रता शिकण्यासारखी आहे. एकदा मैदानावर उतरल्यावर क्रिकेट (Success Tips) व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा तो विचार करत नाही. एम. एस. धोनी या त्याच्यावर निघालेल्या बायोपीकमध्ये देखील आपण हे पहिले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनातील गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच केला पाहिजे.
2. जबाबदारी स्वीकारा (Accept responsibility)
2011 चा विश्वचषक तुम्हाला लक्षात असेलच… विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला लवकर आला होता. धोनीला हे माहिती होते की, त्याच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर सामना हातातून जाऊ शकतो व त्याला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे (Success Tips) लागते. पण, धोनीचा स्वतःवर आत्मविश्वास होता. त्यामुळेच भारताला 2011 चा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते. यामुळे आत्मविश्वासाने नवीन जबादारी स्वीकारा. जीवनात आपण मोठे ध्येय साध्य करायच या उद्देशातून स्पर्धा परीक्षांकडे वळले आहोत तर साहजिकच जास्त कष्ट घेणे ही आपली अपरिहार्य जबाबदारीच आहे आणि त्यात आपण 100% योगदान देऊ, तेव्हाच यश तुमचे असेल.
3) दबावात चांगला परफॉर्मन्स देण्याची कला (Performs even better under pressure)
खरं तर जेव्हा खेळाडूंवर जास्त दबाव येतो, तेव्हा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते आणि तो काही तरी चूक करतो. पण, धोनीचे या उलट होते. धोनीवर जितका अधिक दबाव तितका त्याचा खेळ अजून खुलून उठतो. यासाठीच धोनी जगप्रसिद्ध आहे. धोनीकडून आपण हे शिकायलाच हवं. ठराविक वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. यात सुरवातीला थोडी चूक झाली कि आपण पुढे संपूर्ण परीक्षेत चुका करत बसतो. हे प्रकर्षाने टाळणे आवश्यक आहे.
या सोबतच ऐन परीक्षेच्या वेळी कमी दिवसात Final Revision करणे ही बाब सारखीच नाही का? या वरच पुष्कळदा तुमचं यश अवलंबून असते हे विसरता कामा नये.
4) खचू नका (Don’t get tired) (Success Tips)
आज धोनीचे सर्वत्र कौतुक होत असेल पण त्याचा सुरवातीचा काळ असा नव्हता. भारतीय संघात आपले स्थान भक्कम करण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याला फारच मेहनत घ्यावी लागली आहे. तसे पाहिले तर धोनीने अनेकवेळा पराभवाचा सामना केला आहे. पण, त्याने त्याच्या पराभवाचा स्वत:वर आणि संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडू दिला नाही. आपल्या पराभवाचाही त्याने खंबीरतेने स्विकार केला आणि त्यातून नव्या गोष्टी शिकल्या असल्याचे आपण पहिले आहे. याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकांना अपयश येत असते. पण या अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने पुढील परीक्षेच्या तयारीला आपण लागले पाहिजे.
5) सर्वांचा सन्मान करा (Respect Everyone)
धोनी कायमच इतरांशी सन्मानाने वागत आलाय. इतकं प्रचंड यश मिळवल्यावरही धोनीच्या वागण्यात विनम्रता आहे. त्याच्या याच स्वभावामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र (Success Tips) सेहवाग आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळू शकले. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतांना आपल्या सिनियर्स प्रमाणे ज्युनियर विद्यार्थ्यांशी देखील विनम्रतेनेच वागा. यश मिळाले तर लगेच हवेत न जाता पाय जमिनीवरच राहू द्या.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com