करिअरनामा ऑनलाईन । NEET ही देशातील सर्वात कठीण (Success Story) परीक्षा मानली जाते. जो विद्यार्थी ही परीक्षा पास करतो; तो जिंकतोच. ही परीक्षा पास करणे अनेकांचं स्वप्न असतं. दिल्लीत राहणारी रितिका पालची. तिनं NEET परीक्षेत यश मिळवण्याचं ध्येय बाळगलं आणि ते पूर्णही केलं. पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. रितीकाच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण तिची स्वप्ने मोठी होती. आजी गमावल्याच्या दु:खातून सावरलेल्या रितिकाने कॅन्सर स्पेशालिस्ट होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने तिचा प्रवास सुरु झाला. या प्रवासातील पहिला टप्पा म्हणजे NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनणे.
वडील कारखान्यात कामगार तर आई गृहिणी
रितिकाचे पाच जणांचे कुटुंब पूर्व दिल्लीच्या मोलारबंद भागात छोट्या अपार्टमेंटमध्ये राहते. रितिकाला आयुष्यात मोठी झेप घ्यायची होती. पण हे वेड पूर्ण करण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रितिकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर नव्हते आणि तिला जगण्यासाठी दररोज संघर्ष (Success Story) करावा लागत होता. तिचे वडील अगदी कमी पगरावर भरतकामाच्या कारखान्यात काम करतात तर तिची आई गृहिणी आहे. रितिकाच्या पालकांकडे तिला दिल्लीतील खासगी NEET कोचिंग क्लासमध्ये पाठवण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. शिवाय, कोविड-19 महामारीच्या काळात अभ्यासात सातत्य राहिले नाही; त्यामुळे NEET क्रॅक करण्याच्या ध्येयापासून टी दूर राहिली.
पुस्तक विकत घेण्यासाठी आईचे दागिने विकले (Success Story)
रितिका NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या वर्गमित्रांकडून पुस्तके आणि नोट्स उधार घेत असे. अभ्यासाच्या तयारीसाठी तिने स्वतःला पूर्णपणे तयार केले. त्याच्या पालकांना कोचिंग क्लासची फी परवडत नव्हती तसेच त्यांच्याकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफोन नव्हता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी रितिका आणि तिच्या कुटुंबाने एक कठीण पाऊल उचलले. तिच्या आईने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकले. या पैशातून रितिकाने जीवशास्त्राची पुस्तके विकत घेतली आणि NEET ची तयारी करण्यासाठी YouTube वरील व्हिडिओ आणि मोफत ऑनलाइन क्लासेसची मदत घेतली.
डॉक्टर होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार (Success Story)
जीवतोड मेहनत घेत रितिकाचा अभ्यास सुरु होता. तिला बारावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळाले आहेत. तर NEET परीक्षेत तिने 720 पैकी 500 गुणांसह 3032 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली आहे. आता लवकरच तिचे आणि तिच्या आई-वडिलांनी रितिकासाठी पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com