Success Story : तो थकला नाही; डॉलरमध्येच हवा होता पगार; 600 E-mails आणि 80 कॉल्स करून मिळवली मनासारखी नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | कोरोनामुळे रोजगार क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसंच कोरोना (Success Story ) आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकऱ्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत; पण काही जण असे आहेत, की ज्यांनी कोरोनाला आपत्ती मानण्यापेक्षा त्यात संधी शोधली आणि यश मिळवलं. सध्याच्या काळात मनासारखी नोकरी मिळणं तसं अवघड झालं आहे. आज लाखो बेरोजगार युवक मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. त्यात काही जणांना यश मिळतं, तर काही अपयशी ठरतात. वत्सल नाहटा हा युवक त्यापैकीच एक होय. वत्सल यांचा मनासारखी नोकरी मिळवण्याचा संघर्ष अन्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आपत्तीत संधी शोधण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद म्हणावी लागेल. सध्या वत्सल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत आहेत; पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. आज आपण त्यांच्या संघर्षाची कहाणी वाचणार आहोत…

 

ड्रीम जॉबसाठी 600 ई-मेल्स आणि 80 कॉल्स

ज्या व्यक्ती कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतात आणि कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी आयुष्य आश्चर्यानं भरलेलं आहे. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी मिळवणारे वत्सल नाहटा (Success Story ) यांची कहाणी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जागतिक बॅंकेत नोकरी करण्याचं स्वप्न वत्सल यांनी पाहिलं होतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. 600 ई-मेल्स आणि 80 कॉल्स केल्यानंतर त्यांना हा ड्रीम जॉब मिळाला.

वत्सल यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात कोविड-19 महामारीदरम्यान सुरू झाली. वास्तविक 2020 मध्ये ते अमेरिकेतल्या येल विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण करणार होते; मात्र तो काळ मंदीचा होता. कंपन्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकत होत्या. दुसरीकडे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची इमिग्रेशनबाबतची भूमिका कठोर होती. केवळ अमेरिकी नागरिकांनाच नोकऱ्या द्याव्यात, असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. “त्या वेळी मी येलमध्ये शिक्षण घेत होतो. माझ्याकडे जॉब नव्हता. पदवी घेऊन जेमतेम दोन महिनेच झाले होते,” असं वत्सल सांगतात.

Success Story of Vatsal Nahata

वत्सल सांगतात… (Success Story )

वत्सल नाहटा सध्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये कार्यरत आहेत. “संघर्षाच्या कालावधीत मी काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो,” असं ते सांगतात. “या काळाने मला नेटवर्किंगची खरी ताकद दाखवली आणि आता तो माझा स्वभाव बनला आहे,” असं वत्सल नमूद करतात. “संकटाचा, संघर्षाचा म्हणजेच माझ्यासाठी कोविड-19 महामारी आणि ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा हा काळ अधिक विकसित व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी आदर्श होता. माझी आयव्ही लीगची पदवी मला इथपर्यंत पोहोचवू शकते, असा विश्वास होता. नेटवर्किंगमुळे कोणत्याही परिस्थितीत मी जगू शकतो आणि अमेरिकेत अनिवासी म्हणून माझा मार्ग मी शोधू शकतो हा विश्वास मिळाला,” असं वत्सल सांगतात.

पालकांना सत्य परिस्थिती सांगणं अवघड होतं

वत्सल यांचा प्रवास कोविड-19 महामारीदरम्यान सुरू झाला. “अमेरिकेत जॉब मिळत नसेल तर येल विद्यापीठात शिक्षणासाठी येऊन काय फायदा,” असं वत्सल म्हणतात. “जेव्हा माझ्या पालकांनी फोन करून मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतोय असं विचारलं तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती सांगणं माझ्यासाठी अवघड गेलं. भारतात (Success Story ) परतण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही. मला माझा पहिला पगार डॉलरमध्येच हवा आहे,” असा निश्चिय केल्याचं वत्सल यांनी सांगितलं. वत्सल यांचा हा निश्चय दृढ होता. दोन महिन्यांत त्यांनी 1500 पेक्षा जास्त कनेक्शन रिक्वेस्ट पाठवल्या, 600 कोल्ड ई-मेल लिहिले आणि 80 व्यक्तींना विविध प्रकारचे कॉल्स केले.

Success Story of Vatsal Nahata

सर्वांत जास्त रिजेक्शनचा सामना केला

“मला आतापर्यंत सर्वांत जास्त रिजेक्शनचा सामना करावा लागला; पण गरज ओळखून मी स्वतःला खंबीर बनवलं होतं आणि आपण इथून कुठेही जायचं नाही असं मनाशी ठरवलं होतं. आता माझा ध्यास इतका पराकोटीला गेला होती, की मी स्वप्नातही नोकरीसाठी कॉल करू लागलो होतो,” असं वत्सल सांगतात. अखेरीस वत्सल यांचे प्रयत्न आणि कष्ट फळाला आले. “मला जागतिक बॅंकेत नोकरी मिळाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्याकडे चार जॉब ऑफर्स होत्या. त्यात मी जागतिक बॅंकेतल्या नोकरीची निवड केली. माझ्या ओपीटीनंतर कंपनी माझा व्हिसा स्पॉन्सर करण्यास तयार होती. माझ्या व्यवस्थापकानं मला जागतिक बॅंकेच्या विद्यमान संशोधन संचालकांसोबत मशीन लर्निंग पेपरचे सह-लेखक म्हणून काम करण्याची ऑफर दिली,” असं वत्सल यांनी सांगितलं.

एकूणच मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी वत्सल नाहटा (Success Story ) यांनी केलेला संघर्ष, तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही आणि ध्येय गाठल्याशिवाय मागे हटायचं नाही, ही वृत्ती त्यांना यशापर्यंत घेऊन गेल्याचं दिसतं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com