Success Story : वडील IPS; IIT मधून B.Tech; देशात 3री रँक; 5व्या प्रयत्नात यश खेचणाऱ्या IASने सांगितलं यशाचं रहस्य 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उमा हर्थी एन हिने UPSC 2022 च्या परीक्षेत (Success Story) संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमा यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आयपीएस वडिलांना दिले. हर्थीचे वडील एन व्यंकटेश्वरलू सध्या तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
हे यश वडिलांचे
उमा हर्थी हिने आयआयटी-हैदराबाद येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले आहे. तिने अॅन्ड्रोलॉजी हा पर्यायी विषय घेवून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने परीक्षेच्या पाचव्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माझ्या यशात माझ्या वडिलांचा शंभर टक्के वाटा असल्याचे तिने म्हटले आहे.

Success Story Uma Harathi N

4 वेळा नापास.. 5व्या प्रयत्नात यश
उमा हराथी एन या तेलंगणाच्या रहिवासी आहेत. तिचे वय 28 वर्षे आहे. तिने आयआयटी हैदराबादमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. तिचे वडील (Success Story) एन व्यंकटेश्वरलू हे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते तेलंगणा कॅडरमध्ये नारायणपेट येथे एसपी म्हणून कार्यरत आहेत. उमाचा हा पाचवा प्रयत्न होता. नागरी सेवा परीक्षेत ती 4 वेळा नापास झाली होती. पाचव्या प्रयत्नात तिने आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकून त्या चुका सुधारल्या.
उमा हरती एन यांनी मानववंशशास्त्र हा ऐच्छिक विषय निवडला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती ऑनलाइन सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रुजू झाली. तेथे तिने सुमारे 6 महिने अध्यापन केले. यानंतर सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती जपानला गेली. उमा हरती एन पुन्हा एकदा मुलाखतीच्या फेरीत पोहोचली होती.

Success Story Uma Harathi N

कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा (Success Story)
यासोबतच उमा हर्थीने आपल्या यशासाठी कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. ती म्हणते; “पुरुष असो किंवा स्त्री, त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी (Success Story) कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक असतो. कुटुंबामुळेच मी कठोर तयारी करू शकले. मला फक्त चांगली रँक मिळण्याची अपेक्षा होती, पण मी संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक मिळवेन ही अपेक्षा नव्हती.”

 

Success Story Uma Harathi N

तरुणांनी निराश होऊ नका
उमा हर्थी म्हणते; “या परीक्षेसाठी भावनिक आधार, कौटुंबिक आधाराची गरज आहे. अभ्यासासाचे साहित्य, पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत, पण याबरोबरच विद्यार्थ्यांना भावनिक आधार, कौटुंबिक आधार मिळणंही गरजेचं आहे.” स्वतःचे उदाहरण देताना ती म्हणते; “गेल्या पाच वर्षात मी परीक्षा (Success Story) देत असताना अनेकवेळा अपयश पाहिले आहे. यावेळी मला माझ्या कुटुंबाने मानसिक आधार दिल्यामुळे मी खचले नाही. कुटुंबातील सदस्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यामुळे मी आज हे यश मिळवू शकले.” तसेच UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश देताना हर्थी म्हणते की, त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या क्षमतेवर शंका न घेता त्यांना स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहन द्यावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com