Success Story: 2 बहिणींनी करून दाखवलं!! एक झाली IAS तर दुसरी IPS…यशामागील कहाणी वाचाच

Success Story
Success Story
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। (Success Story) अनेकांच स्वप्न असत अधिकारी होवून आपल्या खडतर परिस्थितीला सडेतोड उत्तर द्याव. सामान्य कुटुंबात जन्म झाला, घरात गरिबीचा सामना करावा लागतो तरीही शिकण्याची कास सुटत नाही, कितीतरी वेळा अपयश पदरी आलं पण जिद्द सोडली नाही. आपण आज अश्याच दोन बहीणींची जिद्धी ची कहाणी पाहणार आहोत. दोघी बहिणी आणि दोघी अधिकारी कश्या झाल्या? त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी कसा बनला तेच आजच्या या स्टोरीमधून जाणून घेवूयात.

त्सुनामीने बेघर केलं –

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. घरात हलाखीची परिस्थिती होती उदरनिर्वाह देखील करणं अवघड होत. या परिस्थित भर म्हणून की काय 2004 मध्ये त्सुनामी येते आणि त्यांना आपल घर गमवाव लागल. या भयानक परिस्थितीचा सामना त्या करतच होत्या. असंख्य दुखांना तोंड देत पुढे जात राहणं, संघर्षात देखील हार न मानणं या दोघी बहीणींनी केल म्हणून आज त्यांच स्वप्न त्या पूर्ण करू शकल्या. (Success Story)

आयएएस (IAS) ईश्वर्या रामनाथन –

ईश्वर्या ही लहान बहीण. आपल्याला यूपीएससी द्यायची आहे आधिकारी व्हायच आहे अशी दृढ इच्छा बाळगणारी ईश्वर्या हिने 2018 साली यूपीएससी परीक्षा दिली आणि अखिल भारतीय 628 वा क्रमांक मिळवला, त्यानंतर तिची रेल्वे अकाउंट्स सर्व्हिस (RAS) साठी निवड झाली.पण मिळालेल्या रॅंकवर ती समाधानी नव्हती. म्हणून तिने 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी ती फक्त 22 व्या वर्षी 44 व्या रँकसह आयएएस (IAS) अधिकारी बनली. ईश्वर्याला तामिळनाडू केडर मिळाला आहे.

आयपीएस (IPS) सुष्मिता रामनाथन –

सुष्मिता घरातील मोठी मुलगी आणि ईश्वर्या हिची मोठी बहीण. तिने UPSC साठी खूप मेहनत घेतली, परंतु मेहनत करूनही यश हाती येत नव्हत पहिल्या पाच प्रयत्नात तिला यश मिळाल नाही पण तिने हार मानली नाही आणि 2022 मध्ये पुन्हा परीक्षेला बसली. यावेळी मात्र तिने 528 व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची आयपीएससाठी निवड झाली. तिला आंध्र प्रदेश केडर मिळाला आहे. (Success Story)

यूपीएससी परीक्षा म्हटल की तिथे तुम्हांला शारीरिक, मानसिक दोन्ही बाजूने मजबूत राहावं लागत. अपयशाचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. हेच आपण या दोघी बहीणींच्या या संपूर्ण प्रवासतून शिकायला हवं.

हे पण वाचा – NTPC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC द्वारे 400 रिक्त जागांची भरती जाहीर