करिअरनामा ऑनलाईन । सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही?? गुगल (Success Story) आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आज संपूर्ण जगात प्रख्यात आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, जगातील सर्वोच्च सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जातात. पिचाई यांना मिळणारा पगार हजारो, लाखो किंवा कोटीत नसून ते अब्जावधी रुपये पगार मिळवतात. सुंदर पिचाई आज करोडपती असले तरी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाच्या कहाणीला शोभावी अशी त्यांची यशोगाथा आहे.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
अलीकडेच पिचाई यांना नुकतेच अमेरिकेत भारतातील प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भारत सरकारने वर्ष २०२२ साठी (Success Story) व्यापार आणि उद्योग श्रेणीसाठी दिला आहे. पिचाई यांना अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी हा सन्मान दिला. या खास प्रसंगी सुंदर पिचाई भावूक दिसले.
वडिलांनी एक वर्षाचा पगार देऊन अमेरिकेचे तिकीट काढले (Success Story)
सुंदर पिचाई म्हणतात की, “जेव्हा अमेरिकेत अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते सोपे नव्हते. त्यावेळी वडिलांचा एक वर्षाचा पगार देऊन मला तिकीट काढावे लागले.” एक काळ असा होता की सुंदर पिचाई यांना भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र, आज त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, की ते केवळ विमानाचे तिकीटच नाही तर विमान देखील खरेदी करू शकतात.
अमेरिकेत राहताना खूप संघर्ष करावा लागला
भारतीय वंशाच्या पिचाई यांचा जन्म 12 जुलै 1972 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण भारतातच पूर्ण केले. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी (Success Story) केल्यानंतर त्यांनी व्हार्टन बिझनेस स्कूलमधून MBA शिक्षण पूर्ण केले. तर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी मेटलर्जिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. अमेरिकेत राहताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तिथला खर्च भागवणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं.
पहिल्यांदा अमेरिकेत संगणक पाहिला
एका मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले होते की; आज ते जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचे प्रमुख असले तरी अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.” त्यांचे जुने दिवस, संघर्ष आणि बालपण ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा ते अमेरिकेत (Success Story) आले होते तेव्हा ISD कॉलचे शुल्क प्रति मिनिट 2 डॉलर होते. खर्च जास्त असल्याने त्यांना घरच्यांशी जास्त वेळ बोलता येत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा पिचाई यांनी फक्त अमेरिकेत संगणक पाहिला.
जगातील सर्वात महागडे CEO
आज पिचाई हे जगातील सर्वात महागडे CEO आहेत. सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती अंदाजे 1310 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 10,810 कोटी रुपये आहे. सुंदर पिचाई (Success Story) यांची निव्वळ संपत्ती दरवर्षी वाढते. पिचाई यांचा वार्षिक पगार 242 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1,880 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, त्यांना दरमहा सुमारे 20 दशलक्ष डॉलर पगार मिळतो, जो जगातील सर्वात मोठ्या पगारांपैकी एक आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com