Success Story : दोन्ही हात नसलेली मुलगी झाली तिरंदाज; पॅरालम्पिकमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 16 वर्षांच्या शीतल देवीला दोन्ही हात (Success Story) नाहीत तरीही तिने हिंमत गमावली नाही. हातांशिवाय स्पर्धा खेळणारी शीतल देवी (Shital Devi) ही जगातील पहिली आणि एकमेव सक्रिय महिला तिरंदाज आहे. अलीकडेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पात्रता फेरीत तिने एक नवा विश्वविक्रम केला आहे, त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हात नसलेली ही मुलगी तिरंदाजीच्या जगात कशी खेळाडू बनली ते आपण जाणून घेऊया…

सर्व सामान्य कुटुंबातील आहे शीतल
शीतल देवी यांचा जन्म 10 जानेवारी 2007 रोजी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड या छोट्याशा गावात झाला. शीतल देवीचे वडील शेतकरी आहेत तर तिची आई शेळ्या चरायला नेते. शीतल देवीला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. असे म्हटले जाते की, तिला फोकोमेलिया नावाचा जन्मजात आजार आहे, परंतु त्यानंतरही तिने हार मानली नाही आणि धनुर्विद्येच्या जगात तिने असे स्थान मिळवले जे फार कमी लोक मिळवू शकतात.

पायाने करते तिरंदाजी (Success Story)
शीतल देवीदोन्ही हात नाहीत म्हणून थांबली नाही. हात नसले तरी ती फक्त पायाने तिरंदाजी करते. खुर्चीवर बसून शीतल देवी उजव्या पायाने धनुष्य उचलते आणि नंतर उजव्या खांद्यावरून तार ओढते. ती तिच्या जबड्याच्या जोरावर बाण सोडते. तिचे कौशल्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले की एक मुलगी अशी तिरंदाजी कशी करू शकते. शीतल देवीने जगाला दाखवून दिले आहे की, उंच उडणे पंखांनी नाही तर धैर्याने होते.

15 वर्षाची होईपर्यंत शितलने धनुष्यबाण नव्हता
सामान्य शेतकरी कुटुंबात शीतलचा जन्म झाला आहे. तिने वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत धनुष्यबाणही पाहिलेला नव्हता. जेव्हा ती हात नसताना झाडावर चढताना दिसली तेव्हा लोकांना (Success Story) तिची प्रतिभा कळली. 2022 मध्ये कोणाच्यातरी सांगण्यावरून ती जम्मूच्या कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचली. वास्तविक हे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. हे क्रीडा संकुलही तिच्या घरापासून 200 किमी अंतरावर होते. तेथे तिने अभिलाषा चौधरी आणि प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांची भेट घेतली. येथूनच शीतलदेवीचे आयुष्य बदलले. या दोन्ही प्रशिक्षकांनी शीतलला तिरंदाजीची ओळख तर करून दिलीच पण तिचे प्रशिक्षणही सुरू केले. ती कटरा येथील प्रशिक्षण शिबिरासाठी गेली होती. त्यानंतर, ती तिच्या करिअरमध्ये सतत नवीन उंची गाठत राहिली.

पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली (Success Story)
आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये शीतल देवीने चांगली कामगिरी केली होती. चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके जिंकली होती. एकाच सत्रात दोन सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या कामगिरीबद्दल शीतलला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com