Success Story : शिक्षकांनी दिला होता हाऊस वाईफ होण्याचा सल्ला; पण ती ठरली फ्लाईंग बोट बनवणारी आघाडीची महिला 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संप्रीती भट्टाचार्य ही मुळची (Success Story) कोलकत्त्याची. आयुष्यात आपण काही करु शकू की नाही हे तिला माहित नव्हतं. कारण ती एक सामान्य विद्यार्थिनी होती. फिजिक्समध्ये ती नापासही झाली होती. त्यावेळी तिला अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. तिच्या शिक्षकांनी तर तिला गृहिणी होण्याचा सल्ला दिला होता. पण हीच सामान्य विद्यार्थिनी आज फ्लाईंग बोट बनवणारी एक धडाडीची उद्योजिका बनली आहे.
संप्रीती अवघी ३६ वर्षाची आहे. ‘नेवियर’ या संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा संप्रीती सांभाळत आहे. येथे तयार होणारी ‘नेवियर ३०’ ही इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल बोट समुद्री उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवत आहे. ही जगातली सर्वात लांब पल्ल्याची आणि अमेरिकेतली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉयलिंग बोट असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सतत शिक्षकांची टोमणे ऐकावे लागत (Success Story)
संप्रीती सांगते; “विद्यार्थीदशेत असताना मला फिजिक्स हा विषय आवडत नव्हता. मी गणितातही फार हुशार नव्हते.  यामुळे मला सतत शिक्षकांची बोलणी ऐकावी लागत होती. पण या गोष्टीचा मी स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. शिक्षकांना वाटायचं की, मी आयुष्यात काही करू शकत नाही. मी गृहिणी होवून घरची कामं करावं किंवा एखादी छोटी नोकरी स्वीकारून त्यामध्ये समाधान मानावं.”

नोकरीसाठी केले 540 ईमेल
२० वर्षांची असताना मी नोकरीसाठी एक दोन नव्हे ते सुमारे ५४० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केले होते. मला  अमेरिकेमध्ये एका पार्टिकल फिजिक्स प्रयोगशाळेमध्ये नोकरी मिळाली. विशेष म्हणजे ५४० इमेलपैकी प्रत्येक मेलमध्ये मी त्यांना असं विचारलं होतं की; ‘मी काय काय करू शकते?’. त्यापैकी माझ्या प्रश्नाला फक्त ४ जणांनी उत्तर दिलं आणि शेवटी फक्त एकाच कंपनीने काम दिलं, तेही इंटर्नशिपचं.

बोट बनवण्यासाठी तयार केली टीम
यानंतर संप्रीति रिसर्च असिस्टंट म्हणून शिकागो इथं गेली. तेव्हाच तिथे तिला विज्ञानाची गोडी निर्माण झाली. तिने ‘नासा’मध्ये आणखी एकदा इंटर्नशीप केली. त्यानंतर तिने (Success Story) ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डिग्री आणि एमआयटीमधून पीएचडी केली. त्यानंतर ती सॅन फ्रान्सिस्कोला गेली आणि 12 मिलियन डॉलर गोळा करून बोट बनवण्यासाठी एक टीम तयार केली.

फोर्ब्सच्या यादीतील शक्तिशाली महिला
तिच्या कामही दखल घेत २०१६ मध्ये तिला फोर्ब्सकडून जगातल्या पहिल्या ३० सर्वात शक्तिशाली युवा चेंजर्सच्या यादीमध्ये समाविष्ट कऱण्यात आलं होतं. संप्रीति म्हणते की, “गेल्या १३ वर्षांमध्ये मी खूप काही शिकले. यातून मला कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरं जाण्याचा आत्मविश्वास मिळाला.”

अशी आहे फ्लाईंग बोट?
‘नेवियर ३०’ या फ्लाईंग बोटचं डिझाईन विमानासारखं आहे. या बोटीत पाण्यामधल्या भागामध्ये तीन पंख आहेत. जेव्हा बोट वेगाने चालते, तेव्हा हवेमुळे ही बोट लाटांच्या (Success Story) वर येते. अशा पद्धतीने फक्त फास्ट आणि जास्त ताकदीनेच नव्हे तर कोणताही आवाज न करता ही बोट चालते. स्टार्टअप N30 चं एक नाव ‘द बोट ऑफ द फ्युचर’ असंही आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com