Success Story : दोन मित्रांची कमाल!! ChatGPT वापरून 15 हजारात सुरु केलेला स्टार्टअप 1.4 कोटींना विकला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । CNBC च्या अहवालानुसार (Success Story) साल्वाटोर आयलो आणि मोनिका पॉवर्स या दोन मित्रांनी ChatGPT च्या मदतीने एक स्टार्टअप सुरु केला ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी केवळ 15 हजार रुपये डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास 185 डॉलरची गुंतवणूक केली. दोघांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आधारित तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर केला की काही महिन्यांनंतर एका व्यावसायिकाने त्यांचा स्टार्टअप 1.5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.40 कोटी रुपयात खरेदी केला आहे.

तुम्ही तंत्रज्ञानाला कल्पनेची जोड दिली तर तुम्हाला कोणत्याही स्तरावरून यश मिळवता येते; ही म्हण दोन्ही मित्रांनी सिद्ध करून दाखवली आहे. AI (Artificial Intelligence) आधारित तंत्रज्ञान चॅटजीपीटी (ChatGpt) वापरून दोन मित्रांनी एक स्टार्टअप तयार केला जो काही मिनिटांत व्यवसाय कल्पना यशस्वी झाल्याचा संपूर्ण अहवाल देतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने आज केवळ जीवनच सोपे झाले नाही तर लोकंया माध्यमातून प्रचंड नफाही कमावत आहेत. नवीन युगातील ChatGPT ने देखील असाच मोठा पराक्रम करून दाखवला आहे. ChatGPT वापरून दोन मित्रांनी असं काही केलं आहे की त्यांची गुंतवणूक काही महिन्यांत 15 हजार रुपयांवरून एक कोटी रुपये झाली.

ChatGPT ने कमालच केली… कशी सुचली कल्पना….
आयलो आणि मोनिका यांना सिलिकॉन व्हॅलीच्या स्टार्टअप, एक्सीलरेटर Y कॉम्बिनेटरच्या मदतीने व्हर्च्युअल स्टार्टअपची कल्पना सुचली. चॅटजीपीटीला योग्य प्रश्न कसे विचारायचे या समस्येचे (Success Story) निराकरण करण्यासाठी या दोघांनी स्टार्टअप तयार केले. दोघांनी एकत्रितपणे एक AI-आधारित रिसर्च टूल तयार केले, जे आयडियांना योग्य स्वरूपात रूपांतरित करते आणि नंतर लोकांना ChatGPT योग्य प्रकारे कसे वापरायचे ते शिकवते.

ही कल्पना उद्योजकांना वरदान ठरली (Success Story)
आयलो आणि मोनिका यांनी आपली कल्पना स्टार्टअपमध्ये बदलली आणि ‘DimeADozen’ या नावाचे ॲप तयार केले जे नवीन बिझनेस कल्पनेचे विश्लेषण करून अहवाल तयार करते आणि संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करते. याची किंमत फक्त 39 डॉलर म्हणजे सुमारे 3159 रुपये असून पारंपारिक संशोधन एजन्सी आणि सर्च इंजिनपेक्षा अधिक वेगाने त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

काही महिन्यातच केली लाखोंची कमाई
‘DimeADozen’ ने आयलो आणि मोनिका या दोन मित्रांना प्रचंड नफा मिळवून दिला आणि अवघ्या सात महिन्यांत या स्टार्टअपने 66 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 55 लाख रुपये (Success Story) कमाई केली. विशेष म्हणजे या स्टार्टअपसाठी फक्त 150 डॉलर म्हणजे सुमारे 15 हजार रुपये खर्च करण्यात आला होता, तर डेटाबेसवर 35 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,800 रुपये खर्च करण्यात आले आहेत.

काही हजारात सुरु केलेला स्टार्टअप कोटीत विकला गेला
बघता बघता मोनिका आणि आयलो यांनी अवघ्या काही महिन्यात (Success Story) एवढा मोठा नफा कमावला आहे. पण त्यांची खरी कमाई तेव्हा झाली जेव्हा फेलिप अरोसिमेना आणि डॅनियल डी कॉर्नेली यांनी त्यांचे स्टार्टअप 1.50 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 1.40 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टार्टअपला पूर्णवेळ प्रकल्प बनवण्याचा या जोडीचा उद्देश असून आयलो आणि पॉवर यांचाही या प्रकल्पात सल्लागार म्हणून समावेश करण्यात आला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com