करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या (Success Story) क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. यानुसार काहीजण आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करतात तर काही जणांच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळते की ते कल्पनाही करू शकत नाहीत अशा क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतात. टी. व्ही. सिरियल्स, सिनेमा, वेब सीरिज अशा सर्वच माध्यमातून आपल्या भूमिकेची छाप सोडणाऱ्या अभिनेत्रीलाही IAS बनायचं होतं. त्यासाठी तिने अभ्यासही सुरु केला होता. पण आयुष्यात एक क्षण असा आला आणि कलाक्षेत्रात तिने मोठं यश मिळवलं. ही अभिनेत्री टेलिव्हिजन स्टार साक्षी तन्वर आहे.
बनायचं होतं IAS
सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कलाकाराला एका सिनेमा किंवा मालिकेतून मिळालेलं स्टारडम (Success Story) शेवटपर्यंत टिकवावं लागतं. पण एक अशी अभिनेत्री आहे, जी अभिनय क्षेत्रात चुकून आली. या अभिनेत्रीला IAS (Success Story) बनायचं होतं, पण नशिबाने तिला सिनेसृष्टीत आणलं आणि ती स्टार अभिनेत्री बनली.
टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये साकारली भूमिका
टीव्ही क्षेत्रात या अभिनेत्रीचं मोठं नाव आहे. तिच्या अतिशय सहज, साध्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. अभिनेत्रीने टीव्ही विश्वात प्रवेश करुन जादू केली पण ती टीव्हीपर्यंतच मर्यादित न राहता बॉलिवूडमध्येही तिने मोठं नाव कमावलं आहे.
वडील CBI ऑफिसर
साक्षी राजस्थानची राहणारी आहे. ती एका अतिशय सुशिक्षित कुटुंबातील आहे. साक्षीचे वडील CBIऑफिसर होते. तिच्या घराला सुरुवातीपासूनच शैक्षणिक वारसा होता. साक्षी शिक्षणात अतिशय हुशार होती. वडील CBI ऑफिसर असल्याने तिलाही IAS बनायचं होतं.
अशी झाली कलाविश्वात सुरुवात (Success Story)
दिल्लीत ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर साक्षी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेजची तयारी करत होती. त्याचवेळी तिने पॉकेटमनीसाठी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून नोकरी केली. अचानक एक दिवस एका मित्राच्या सांगण्यावरुन ती दूरदर्शनवरील ‘अलबेला सुर मेला’ या शोसाठी ऑडिशन देण्यासाठी गेली होती.
एकता कपूरच्या शोमधून मिळाली लोकप्रियता
१९९८ मध्ये याच शोसाठी साक्षीची प्रेजेंटर म्हणून निवड झाली आणि इथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. या शोमधून मिळालेल्या प्रसिद्धीतून एकता कपूरची नजर साक्षीवर पडली आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेसाठी तिची निवड झाली.
‘कहानी घर घर की’ शोमधून घराघरात पोहोचली
कहानी घर घर की या शोमधून साक्षी घराघरात पोहोचली. त्यानंतर 2011 ते 2014 मध्ये साक्षीने राम कपूर या अभिनेत्यासह ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका केली. या (Success Story) मालिकेने तिच्या करिअरला मोठी उंची मिळवून दिली.
एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये
टीव्हीसह साक्षीने सिनेमा आणि वेब सीरिजमधूनही तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साक्षीने ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दंगल’मध्ये आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याशिवाय साक्षी वेब सीरिज ‘माई’मध्येही भूमिका साकारताना दिसली. साक्षी टीव्हीच्या एका एपिसोडसाठी सव्वा लाख रुपये घेते.
9 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेवून करते सांभाळ
50 वर्षीय साक्षीने अद्यापही लग्न केलेलं नाही. तिने 2018 मध्ये नऊ महिन्यांच्या एका मुलीला दत्तक घेतलं. त्या मुलीचं नाव दिव्या तन्वर ठेवण्यात आलं. साक्षी आता सिंगल मदर म्हणून मुलीचा सांभाळ करत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com