Success Story : सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण; UPSC साठी कठोर मेहनत; IPS अधिकारी बनला.. आता आहे निलंबित; नेमकं काय झालं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपण दररोज आयपीएस किंवा (Success Story) आयएएस अधिकारी यांचे विविध कारनामे ऐकत असतो. काहीजण त्यांच्या कामामुळे तर काही त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात. असाच एक आयपीएस अधिकारी आहे, जो घाटकोपर होर्डिंग घटनेमुळे चर्चेत आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केले आहे. जीआरपी आयुक्त असताना त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियम डावलून होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. 13 मे रोजी घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. आपण ज्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव क्वैसर खालिद (Quaiser Khalid IPS) आहे.

UPSC मध्ये संपूर्ण भारतात मिळवला 115 वा क्रमांक
क्वेसर खालिदचा जन्म बिहारमधील अररिया येथे झाला. त्यांनी अररिया येथील शाळेतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी सायन्स कॉलेज, पाटणा आणि पाटणा कॉलेज पाटणामध्ये प्रवेश घेतला. क्वेसर खालिद यांना सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी समजले जायचे. चौथीत असल्यापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत (Success Story) त्यांना अनेक शैक्षणिक शिष्यवृत्तीही मिळाल्या आहेत. आयपीएस अधिकारी कैसर यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी भूगोल विषयात बीए आणि एमए पूर्ण केले आहे आणि दोन्ही विषयात ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर 1997 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच IPS पदासाठी निवड झाली. 1997 मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 115 वा क्रमांक मिळवला होता.

पोलीस खात्यात वेगवेगळ्या जबाबदऱ्या पर पाडल्या (Success Story)
महाराष्ट्र सरकारने निलंबित केलेले आयपीएस अधिकारी क्वेसर खालिद सध्या एडीजी पीसीआर (नागरी हक्कांचे संरक्षण) या पदावर होते. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर, कैसर यांनी 19 वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस खात्यात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यानंतर त्यांना मुंबईचे पोलीस महानिरीक्षक (IGP) करण्यात आले. त्यानंतर त्यांना रेल्वे मुंबईचे पोलीस आयुक्त करण्यात आले.

कवी मनाचा अधिकारी
IPS अधिकारी क्वेसर खालिद हे 2005 साली लेखक म्हणून उदयास आले आहेत. कवी सय्यद मोहम्मद अली शाद अजीमाबादी यांच्या काव्यसंग्रहाचे संपादन आणि प्रकाशन केल्यानंतर ते लेखक (Success Story) म्हणून प्रसिद्ध झाले. 2014 साली त्यांचा “शौर-ए-असर” हा समीक्षकांनी प्रशंसनीय केलेला पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. नंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह “दशत-ए-जान” हा 2016 साली प्रकाशित झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com