Success Story : संघर्ष तिच्या पाचवीला पूजलेला; पण जिद्द कायम होती; लग्नानंतर 21 वर्षाने ‘ती’ झाली अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्यपणे खेडेगावात (Success Story) मुलींची लग्ने लवकर होतात. पुनिताच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. लहान वयातच तिची लग्नगाठ बांधून देण्यात आली. पण आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे; ही भावना तिला स्वस्थ बसून देत नव्हती. लग्नानंतर 21 वर्षांनी ती अधिकारी झाली. घरची सून ते सरकारी अधिकारी होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ-उतारांचा तिला सामना करावा लागला. आज ‘तिची’ कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

मजूर वडिलांची मुलगी
पुनीता कुमारी या बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच संघर्षांचा सामना करावा लागला. पुनिताला पाच बहिणी. पुनिता यांचे वडील मजूर होते. वडिलांच्या मिळकतीमधून कसा तरी घर खर्च भागायचा. पण पुनीता यांना शिकायचे होते. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने आई-वडिलांनी त्यांना शिकण्यासाठी पाठिंबा दिला. पुनिता अभ्यासात चांगली होती. त्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशही मिळाला.

12 वी नंतर झालं लग्न
पुनिताचा पाच बहिणींसोबत वाढत होती. घरची आर्थिक (Success Story) परिस्थिती बेताची होती. पुनिता अभ्यासात चांगली होती. अभ्यासाबरोबर पुनिता खेळातही अव्वल होती. शिकून आयुष्यात पुढे जाण्याचे तिचे ध्येय होते. चांगल्या मार्कने पुनिता यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा आला. घरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार पुनीता यांना लग्न करावे लागले. त्यांच्यासाठी हा धक्का होता. अचानक आपल्या स्वप्नांचे पंख छाटले गेल्याची जाणीव त्यांना होवू लागली.

सासरीही अडचणींनी पाठ सोडली नाही (Success Story)
पुनीता लग्नानंतर संसाराचा गाडा ओढण्यात व्यस्त झाल्या. सासरच्या घरचीही आर्थिक परिस्थिती तशी बिकटच होती. अडचणींचा डोंगर समोर उभा होता. काही काळानंतर त्यांच्या पतीची नोकरी गेली. घरची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली. दरम्यान त्या दोन मुलांच्या आई झाल्या. 2004 पुनीता यांच्या पतीला पुन्हा नोकरी लागली. मात्र या उत्पन्नातून घर खर्च भागत नव्हता. अडचणी थांबायचं नाव घेत नव्हत्या.

घर सांभाळत केली सरकारी नोकरीची तयारी
पुनीता यांना बालपण आठवले. बालपणी पाहिलेले स्वप्न पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागले. अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांना पूर्ण करायचे होते. लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. एवढेच नाही तर घर खर्च बहगवण्यासाठी त्यांनी शाळेत छोटी नोकरी पत्करली. आपण जे बिकट दिवस पाहिले ते दिवस आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये; असे त्यांना वाटत होते.  घर सांभाळण्यासोबतच त्यांनी सरकारी नोकरीची तयारीही सुरू केली. यावेळी त्यांचे वय 33 झाले होते. याचा सरळ अर्थ असा होतो की, सरकारी भरतीतील वय मर्यादेच्या नियमानुसार त्या आता अनेक स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरत नव्हत्या.

अखेर सरकारी अधिकारी झाल्या
पुनिता यांना तयांचे ध्येय स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी सरकारी सेवेत (Success Story) भरती होण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यांनी बीपीएससी (Bihar Public Service Commission) परीक्षेची तयारी केली. 2018 मध्ये पुनीता यांनी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची बिहारमध्ये  सहाय्यक कर आयुक्त पदावर निवड झाली. बीपीएससीमध्ये यश मिळवण्यापूर्वी पुनीता यांनी उच्च न्यायालयात पॅरा ज्युडिशियरी स्टाफची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. उच्च न्यायालयातही त्यांनी या पदावर काम केले. हे सगळे करताना पुनिता यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देऊन चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. लहानपणापासून पुनीता यांच्या वाटेत अनेक अडथळे आले. प्रत्येक अडचणीवर मात करत पुनीता न थकता लढत राहिल्या. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे लहानपणी पाहिलेले स्वप्न त्यांनी अखेर पूर्ण केले. त्यांच्या जिद्दीला सलाम!!
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com