Success Story : वडील गेले.. डोक्यावर 27 लाखाचे कर्ज; उपाशी राहिली.. रिक्षा चलकाच्या मुलीने क्रॅक केली NEET

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वात कठीण महाविद्यालयीन (Success Story) प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET. ही परीक्षा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यंदा या परीक्षेत पास झालेल्या प्रेरणा सिंगची (Prerana Singh) कथा ही परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार हे निश्चित. प्रेरणा सिंगने या परीक्षेत 720 पैकी 686 असा स्कोअर केल्यामुळे तिला भारतातील सर्वोत्तम सरकारी वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळाला आहे. या कामगिरीचा तिच्या कुटुंबाला तिचा खूप अभिमान वाटत आहे. तिच्यासाठी उज्ज्वल भविष्याची दारे खुली झाली आहेत. प्रेरणा तिच्या कुटुंबातून पहिली डॉक्टर बनणार आहे.

अनेक आव्हानांचा केला मुकाबला (Success Story)
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रेरणाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ती 20 वर्षाची असताना तिला तिच्या वडिलांच्या अनपेक्षित मृत्यूला सामोरे जावे लागले. तिचे वडील कुटुंबाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. या दु:खद घटनेनंतर कुटुंबाला आधार देण्याचा भार प्रेरणावरच पडला.

दिवसातून एकवेळच जेवायची (Success Story)
अशात त्यांच्या डोक्यावर 27 लाखाचे कर्ज होते जे प्रेरणा आणि तिच्या आईला फेडावे लागले. हाती खूप कमी पैसे येत असल्याने प्रेरणाला रिकाम्या पोटी अभ्यास करावा लागत असे. चपाती आणि चटणी असे दिवसातून एक वेळचे जेवण तिला मिळत असे.
प्रेरणाच्या कुटुंबाची मेहनत आणि तिच्या भावंडांनी शिक्षणात मिळवलेले यश तिला डॉक्टर बनवण्यासाठी मदत करू शकले. प्रेरणाच्या अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आर्थिक संकट आणि वडिलांच्या निधनाचा सामना करावा लागला त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान वाटतो ही कामगिरी अतुलनीयच म्हणावी लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com