करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून महिला (Success Story) फक्त घर कामापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. धैर्याने, हुशारीने, कौशल्याने महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. यापैकीच एक महिला आहे पवनी खंडेलवाल (Pavani Khandelwal). 2017 मध्ये सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज शेकडो महिलांसाठी आधारवड ठरला आहे. त्यांच्यामुळे अनेक महिला आज दरमहा हजारोंची कमाई करत आहेत.
‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप
ड्रायव्हिंग शिकू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची संख्या मोठी आहे. परंतु, प्रशिक्षकाअभावी महिलांना शिकता येत नाही. अशाच एका विभागासाठी मथुरेच्या पवनी खंडेलवाल काम करत आहेत. पवनी महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार देत आहे. पवनीच्या ‘आत्मनिर्भर’ या स्टार्टअपमधील सर्व प्रशिक्षक या महिला आहेत. पवनी यांनी आईकडून प्रेरणा घेतली आणि काम सुरू केले. पवनी यांना या कामातून जीवनाचे ध्येय मिळाले आणि त्यांना महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे साधन उपलब्ध करून देता आले आहे.
पवनीने सांगितले आपल्या प्रवासाविषयी
आपल्या कामविषयी बोलताना पवनी सांगतात; “महिलांना (Success Story) गाडी कशी चालवायची हे माहीत होते, पण त्यांच्याकडे स्वत:ची गाडी नव्हती. या महिलांना मी स्कूटर उपलब्ध करून दिली आणि नंतर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवले. आत्तापर्यंत स्वावलंबनाच्या मदतीने 150 महिलांना रोजगार मिळाला आहे. त्या प्रत्येक महिन्याला 15 ते 20 जणांना प्रशिक्षण देऊन दरमहा 20 हजार रुपये कमावतात.”
200 महिलांना दिला रोजगार (Success Story)
मला वाटायचं की मलाही स्कूटर चालवायला शिकता आलं असतं. मग माझ्या मुलीने मला निराश झाल्याचे पाहिले आणि मला प्रोत्साहन दिले. आज ते धाडस इतके वाढले आहे की आम्ही अनेक शहरांमध्ये आमचे स्टार्टअप सुरू केले आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे; हा या स्टार्टअपचा मुख्य हेतू आहे. मथुरा व्यतिरिक्त जयपूर, दिल्ली, नोएडा, जयपूर, जोधपूर अशा सुमारे 14 शहरांमध्ये हा स्टार्टअप विस्तारला आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी सुमारे 20 हजार महिलांना स्कूटर चालवायला शिकवले आहे. येथे सध्या 200 हून अधिक मुली काम करत आहेत.
स्टार्टअपची कल्पना कशी सुचली?
तीन वर्षांपूर्वी पवनीच्या आईने टू व्हीलर ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शहरात एकही व्यावसायिक महिला ड्रायव्हिंग ट्रेनर नव्हती. बऱ्याच अडचणींनंतर पवनीला एक महिला ड्रायव्हिंग ट्रेनर सापडली. जेव्हा तिची आई ड्रायव्हिंग शिकली तेव्हा इतर अनेक महिला पुढे आल्या ज्यांना फक्त महिलांकडून प्रशिक्षण घेऊन शिकायचे होते. टू व्हीलर शिकल्यानंतर पवनीची आई सांगते की, जेव्हा ती गाडी चालवते तेव्हा तिला पंख असल्याचा भास होतो. केवळ गाडी चालवायला शिकून स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनात किती फरक पडू शकतो याची जाणीव पवनीला या घटनेमुळे झाली. हा तो काळ होता जेव्हा 25 वर्षांच्या पवनी खंडेलवालने 2017 मध्ये ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू केले होते.
‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप फक्त महिलांसाठीच का?
पवनी सांगतात, पुरुषांच्या तुलनेत महिला ड्रायव्हिंगमध्ये मागे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ज्या पुरुषांना गाडी कशी चालवायची ते माहित नाही ते सामान्य ड्रायव्हिंग स्कूलमध्ये (Success Story) प्रशिक्षण घेऊ शकतात. महिला प्रशिक्षकांच्या कमतरतेमुळे पुरुषांकडून दुचाकी चालवताना महिलांना संकोच वाटतो. त्यामुळे केवळ महिलांनाच प्रशिक्षण देण्यासाठी हे स्टार्टअप सुरू करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक शहरात ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू करण्याचं ध्येय
आग्रा, अहमदाबाद, अलीगढ, लखनौ, जोधपूर आणि भरतपूरमध्ये आता ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअप सुरू झाल्याचे पवनी यांनी सांगितले. आता 2021 पर्यंत त्याची व्याप्ती संपूर्ण देशात (Success Story) वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे; अशा महिलांना ‘आत्मनिर्भर’ स्टार्टअपची फ्रेंचाइजी दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com