करिअरनामा ऑनलाईन। दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Success Story) असतात. या सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी दिवसरात्र मेहनतही घेत असतात. मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी मिळते असं नाही. पण आता विचार करा तुम्ही आणि तुमच्या आईने सोबतच सरकारी नोकरीची परीक्षा दिली आणि सोबतच पास झालात तर? तुम्ही म्हणाल हे शक्य नाही. पण हे शक्य झालंय. एकाचवेळी सरकारी नोकरी मिळवलेल्या माय-लेकाच्या प्रेरणा देणाऱ्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
केरळ लोकसेवा आयोगाचा निकाल लागल्यापासून ही आई आणि तिच्या मुलाची जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या या आई-मुलाच्या जोडीने केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकत्र यश मिळवले आहे. दोघांनीही एकाचवेळी यश मिळवल्यामुळे त्यांचं संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आई – मुलाने एकत्र घेतले शिक्षण
केरळमधील मल्लपुरम येथे राहणाऱ्या 42 वर्षीय बिंदू आणि त्यांचा 24 वर्षीय मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाने घेतलेली परीक्षा पास केली आहे. बिंदू आणि विवेक यांनी मिळून या सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. बिंदूने ‘लास्ट ग्रेड सर्व्हंट’ (एलडीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये त्यांचा 92 वा क्रमांक आला आहे. त्याच वेळी, त्यांचा मुलगा विवेक याने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यामध्ये त्याला 38 वा क्रमांक मिळाला आहे. दोघांनीही एकाच कोचिंग क्लासमधून शिक्षण घेतले आहे. अर्थात, ते दोघे एकत्र शिकत होते पण ते एकत्र परीक्षा उत्तीर्ण होतील याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
बिंदु आहेत अंगणवाडी शिक्षिका
विवेक 10 वीत शिकत असताना बिंदूने सरकारी नोकरीची तयारी सुरू केली होती. यादरम्यान बिंदूनेही आपल्या मुलासोबत पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. बिंदू या गेल्या 10 वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पती, शिक्षक, मित्र आणि मुलाचे सहकार्य लाभले असे त्यांचे म्हणणे आहे.
यश मिळवण्यासाठी तरुण असणे गरजेचं नाही (Success Story)
एकूणच काय तर यश मिळवण्यासाठी तुम्ही तरुणच असले पाहिजे असं नाही. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कोणत्याही परीक्षेत यश मिळवता येऊ शकतं हे या आई-मुलाच्या जोडीनं सिद्ध करून दाखवलं आहे.
विवेकने त्याच्या यशाचे श्रेय त्याला सतत प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या आईला दिले आहे. तसेच त्याच्या अभ्यासासाठी सर्व व्यवस्था करणारे त्याचे वडिल आणि प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचे तो आभार मानतो.
बिंदु यांना चौथ्या प्रयत्नात मिळालं यश
विवेकने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईने परीक्षा देण्याचा हा चौथा प्रयत्न होता. कारण त्याची आई मागील सर्व प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरली होती. तो परीक्षेला बसण्यास पात्र ठरल्यानंतर त्याने त्याच्यासोबत आईचा कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला.
“मी कोचिंग क्लासेसमध्ये नियमित जात असे आणि माझी आई रविवारी येत असे. ती आयसीडीएस पर्यवेक्षक परीक्षेची तयारी करत असताना तिला बोनस म्हणून एलजीएस मिळाला. तिने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम म्हणून (Success Story) तिला हे यश मिळाले आहे;” असं विवेकने सांगितले.
महिला उमेदवारांसाठी केरळमधील PSC ची वयोमर्यादा Stream-2 पदांसाठी 40 वर्षे आहे. सरकारकडून भरती प्रक्रियेत काही श्रेणींमध्ये सूट आणि वयोमर्यादेत शिथिलता मिळते. त्यामुळे विवेकच्या आईला या वयात परीक्षा देणे शक्य झाले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com