करिअरनामा ऑनलाईन | घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती नसताना, त्यासोबत लढा देऊन आणि कठीण परिस्थितीचा सामना करत रिक्षाचालकाचा मुलगा एम. डी. डॉक्टर बनला आहे. डॉ. सिद्धेश्वर विष्णू भेंडेकर असे रिक्षाचालकाच्या मुलाचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर म्हणजेच MBBS. DNB (MD) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत मधुमेह व हृदयरोग तज्ञ होण्याचा मान मिळवला आहे.
रा. खादगाव, गंगाखेड, जि. परभणी येथील रहिवाशी असलेल्या सिद्धेश्वरचा शिक्षणाचा प्रवास हा अतिशय खडतर आहे. लहानपणापासूनच शेतीकाम त्यांच्या अंगात होते. आणि ते करत करतच 10 वी पर्यंतचे शिक्षण खादगाव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, व बारावी पर्यंतचे शिक्षण हे गंगाखेड येथे घेतले. अत्यंत मेहनती स्वभाव, जिद्द आणि डॉक्टर होण्याची मजबूत इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा एमबीबीएसला नंबर लावला. आणि अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले.
शासकीय विद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर अनेक जण प्रॅक्टिससुरू करतात. पण त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षणाची कास धरली. त्यांच्या मनात पुढील शिक्षण दिल्ली येथे पूर्ण करण्याची खूपच इच्छा होती. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात दिल्ली येथील सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल म्हणजे ‘मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये नंबर लावला आणि पहिल्याच प्रयत्नात कॉलेजमधून DNB (एमडी)चे शिक्षण पूर्ण केले.
वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकरच आपल्या ग्रामीण भागात जाऊन तिथे २४ तास सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यासोबतच, आजवर घेतलेल्या उच्चशिक्षणाचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सेवेचा फायदा व्हावा. व रुग्णसेवेसोबत समाजसेवासुद्धा घडावी’ अशी भावना सिद्धेश्वर यांनी व्यक्त केली आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com