Success Story : त्याने नोकरीसाठी चक्क रस्त्यावरच ठाण मांडलं; पहिल्याच दिवसापासून पठ्ठ्याला मागणी येवू लागली  

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी युवा वर्ग सतत धडपडत (Success Story) असतो. इंटरव्ह्यूमध्ये एकदा नाकारलं, दोनदा नाकारलं तर माणूस पुन्हा तिसऱ्या ठिकाणी जातो. पण जरा विचार करा; तब्बल 95 वेळा नोकरी नाकारल्यावर काय हालत होईल? MBA ची पदवी हातात असताना सतत नाकारलं जाणं ही गोष्ट मनाला अस्वस्थ करणारी होती. अशा परिस्थितीत काय करावं कळत नव्हतं. मग या युवकानं एक युक्तीच केली. हा युवक थेट रस्त्यावर उभा राहिला. हातात Resume, एक सूटकेस आणि त्यावर लिक्डइन क्यूआर कोडचा (QR Code) मोठा बोर्ड लावला… आणि या युवकाने 5 दिवस रस्त्यावर ठाण मांडले.

हातात MBA ची डिग्री, सूटकेस अन् लिंक्डइन क्यूआर कोड, 95 वेळा लाथाडल्यानंतरही नोकरी कशी मिळाली यासाठी वाचा शहजादची इंटरेस्टिंग स्टोरी…

हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की (Success Story) लोकांनी या युवकला येड्यात काढलं असेल… पण अजिबात नाही.. पहिल्या दिवसापासून पठ्ठ्याला नोकरीसाठी अर्ज सुरु झाले. या पाच दिवसात फक्त एक ते दोन लोकांनीच त्याला निगेटिव्ह कमेंट दिली.
Success Story shahjad

अशी आहे इंटरेस्टिंग स्टोरी

हा भाऊ आता येत्या नोव्हेंबर महिन्यात नवा जॉब जॉइन करतोय. त्यामुळे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी वाचलीच पाहिजे. हा तरुण आहे पाकिस्तानचा. नाव आहे मोहम्मद अरहम शहजाद. पण राहतो लंडनमध्ये. लंडनमध्ये मागच्या वर्षभरापासून तो नोकरी शोधतोय. MBA चं शिक्षण घेतल्यानंतर त्यानं 95 कंपन्यांना अर्ज केले. पण सगळीकडेच त्याला रिजेक्शनचा सामना करावा लागला.

कंफर्ट झोन सोडावा लागला (Success Story)

सतत येणाऱ्या आपयशामुळे त्याने कंफर्ट झोन सोडून आपलंच मार्केटिंग करायचा विचार केला. तो चक्क लंडनच्या रस्त्यावर उभा राहिला. सोबत होते रिझ्यूम, सूटकेस आणि लिक्डइन क्यूआर कोड…

शहजाद सांगतो…

बिझनेस इनसायडरमध्ये शहजादनं मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, “वर्षभर नकार ऐकून मी थकलो होतो. पण थोडा वेगळा प्रयत्न करायचा विचार केला.”

तो म्हणतो, “एक दिवस सकाळीच मला ही कल्पना (Success Story) सूचली. मी एक बोर्ड तयार केला. त्यावर लिंक्डइन क्यूआर कोड चिटकवला आणि माझ्या प्रवास लंडनच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्ट कनारी व्हार्पच्या दिशेने सुरु झाला.”

शहजाद म्हणतो, “मी रस्त्यावर उभा राहिलो, पण लोकांना त्रास दिला नाही. पहिल्या दिवशीच संध्याकाळपर्यंत 200 लोकांनी मला अप्रोच केलं. हा प्रतिसाद माझ्यासाठी धक्कादायक होता. रस्त्यावर माझ्याजवळ अनेकजण थांबले. क्यूआर कोड स्कॅन केला. माझा फोटो काढला. कुणी सेल्फीही घेतला.”

तो पुढे सांगतो; “या दरम्यान JPMorgan चे डायरेक्टरदेखील माझ्याकडे आले. त्यांचं बिझनेस कार्ड त्यांनी मला दिलं. त्यानंतर त्यांनी माझा रिझ्यूम ऑफिसच्या परिसरात पाठवल्याचं सांगितलं.”

शहजादची नोकरी मिळवण्यासाठी ही आगळी-वेगळी धडपड सुरु असलेली पाहून एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसहित शहजादसोबत फोटो काढला.

Success Story shahjad

मनासारखा जॉब मिळालाच 

शहजादला आता डेटा अॅनलिस्टचा अगदी मनासारखा जॉब मिळाला आहे. पुढच्या आठवड्यात तो आणखी 3 इंटरव्ह्यू देणार आहे. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्किल्ड वर्कर व्हिजा आवश्यक असतो. शहजादचा हा व्हिसा एक्सपायर झाला होता. त्यामुळे त्याला अनेक चांगल्या कंपन्यांत (Success Story) अर्ज करता येत नव्हता. या व्हिसासाठी 57 हजार रुपयांपासून1 लाख 30 हजारांपर्यंत खर्च असतो. शहजादने जुलै महिन्यात याविषयी लिंक्ड इनवर पोस्ट लिहिली होती. आता शहजादला जशी हवी तशी नोकरी मिळाल्यामुळे तो खूप खुश आहे. येत्या काळात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याचा मानस त्याने यावेळी बोलून दाखवला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com