Success Story : वडील तुरुंगात,आई चिंतेत, पण मुलीने मानली नाही हार.. लॉ करुन सुरभी झाली सुप्रीम कोर्टात वकील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। तुमच्यात एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती (Success Story) असेल, तर वाटेतील अडचणी तुमचे नुकसान करू शकत नाहीत. तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचाल यात वाद नाही. बिहारचे माजी खासदार बाहुबली आनंद मोहन सिंग यांची मुलगी सुरभी आनंदचीही अशीच कहाणी आहे. सुरभीचे वडील तुरुंगात असतानाही सुरभी आनंदसमोर अडचणी काही कमी नव्हत्या. वडील तुरुंगात असल्याने घरात आई काळजीत होती आणि अशा परिस्थितीत सुरभिला  तिचा अभ्यास पूर्ण करायचा होता, चला तर मग जाणून घेऊया सुरभीने कशी मिळवली कायद्याची पदवी….

Success Story Surabhi Anand

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सुरभी (Success Story)

सुरभी आनंद ही सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. ती स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘कोसीचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेले तिचे पणजोबा राम बहादूर सिंह, आजोबा माणिक प्रसाद सिंह आणि मोठे आजोबा ब्रह्मचारी बाबू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Success Story Surabhi Anand

पुण्यात घेतलं शिक्षण

सुरभी आनंदने पुण्याच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. तिचे पती राजहंस सिंग आणि सुरभी आनंद यांचे कुटुंबीय एकमेकांना (Success Story) अनेक वर्षांपासून ओळखतात. राजहंस आणि सुरभीचा भाऊ चेतन आनंद चांगले मित्र आहेत.

 

 

Success Story Surabhi Anand

वडील तुरुंगात… आईने दिले शिक्षण

सुरभी आनंद भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कायद्याचे प्रॅक्टिस करते. कायद्याच्या विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व राम जेठमलानी यांच्याकडून तिने कायद्याचे बारकावे शिकले (Success Story) आहेत. सुरभी आनंदच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार ती सध्या पाटणा हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहे. वडील आनंद मोहन तुरुंगात गेल्यानंतर, सुरभी आणि तिच्या भावाचे पालनपोषण आणि शिक्षण तिची आई लवली आनंद यांनी केले.

शाही विवाहाची चर्चा (Success Story)

सुरभी आनंद ही बिहारच्या पॉवरफूल नेते आनंद मोहन आणि माजी खासदार लवली सिंग यांची मुलगी आहे. IRTS अधिकारी राजहंस सिंह याच्या सोबतच्या शाही विवाहामुळे सुरभी खूप चर्चेत होती. सुरभी आनंद सिंगची हळद, मेहंदी आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तिने घरातील चिंतित वातावरणावर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. आज आपण तिच्या करिअरविषयी जाणून घेऊया.

Success Story Surabhi Anand

सुरभी आनंद आणि राजहंस सिंह यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या लग्नासाठी सुमारे 15 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शाही लग्नात बिहारचे (Success Story) मुख्यमंत्री नितीश कुमार हे वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. सुरभी आनंद-राजहंस सिंहचे लग्न बैरिया कर्णपुरा गावातील विश्वनाथ फार्म हाऊसमध्ये झाले आहे. या लग्नासाठी सुरभी आनंदचे वडील आनंद मोहन पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com