Success Story : महागडे कोचिंग क्लास न लावता मिळवला MBBS ला प्रवेश; पाहा हिंगोलीच्या कैलासचा प्रेरणादायी प्रवास…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही अनेकांना MBBSला प्रवेश मिळत नाही. पण हिंगोलीतील एका मुलाने क्लासेस न लावता केवळ स्वत: अभ्यास करत यश मिळवले आहे. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरपले होते, अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता संघर्ष करत MBBSला प्रवेश मिळवला आहे कैलास ढोकर याने. अनेक सोयी सुविधा मिळूनही पालकांजवळ सतत तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कैलासचा संघर्ष हा निश्चितच प्रेरणादायी आहे. MBBS चा अभ्यास पूर्ण करून निस्वार्थीपणे रुग्णसेवा करण्याचा कैलासचा मानस आहे. (Success Story of Kailash Dhokar )

कैलास लहान असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आलेल्या कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. परिस्थिती नसल्यामुळे मोठ्या शहरातही त्याला शिक्षणासाठी जाता येत नव्हते. क्लासेसही लावता येत नव्हते. पण कैलास ढोकरने आपला आत्मविश्वास ढासळू दिला नाही. जिद्दीच्या जोरावर त्याने परिस्थितीवर मात केली आणि MBBS ला प्रवेश घेतलाच.

आई – वडिलांविना संघर्ष-

कैलास ढोकर हा मुलगा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील वरुड काजी येथील रहिवासी आहे. बालपणीच कैलासच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले. अनाथ झालेल्या कैलासला त्याच्या काकांनी सांभाळले. प्राथमिक माध्यमिक शिक्षण वरुड काजी येथे पूर्ण झाले. परभणी येथून महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर कैलासने NEET परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू केला. ((Success Story of Kailash Dhokar) पण आर्थिक अडचणीमुळे कैलासला मागील वर्षी नीट परीक्षा देणे शक्य झाले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कैलासने आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक येथे कंपनीत काम करायचं ठरवलं. कैलास नाशिक येथे गेलाही, कंपनीत कामाला सुरुवात केली. कैलासच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सेवासदनला माहिती मिळताच सेवासदनच्या वतीने मीराताई धनराज कदम यांनी संपर्क साधून कैलासला विना अट सेवासदनमध्ये येण्यास विनंती केली. इथे तू अभ्यास कर, इथे आम्ही सर्व मदत करू, या आश्वासनामुळे कैलासनेही होकार दर्शवला आणि अभ्यास सुरु ठेवला.

कैलासच्या यशात सेवासदनचा मदतीचा हात- ((Success Story of Kailash Dhokar)

कैलासला लागणारी सर्व पुस्तके, अभ्यासाचे साहित्य सेवासदनच्या वतीने देण्यात आली. तब्बल एक वर्ष जिद्द आणि चिकाटीने मेहनत केल्यानंतर कैलासने 441 मार्क्स घेत NEET परीक्षा पास केली. या मार्क्ससोबत त्याला हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अनाथ प्रमाणपत्र मिळवून दिले. त्यामुळे त्याला MBBS साठी प्रवेश मिळण्याचा मार्ग आणखीण सुकर झाला. कैलासचा मुंबई येथे वैद्यकीय अभ्यासासाठी MBBS साठी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. मुंबईतील कूपर येथे त्याची निवड झाली आहे. त्याच्या यशाबाबत विचारलं असता, कैलासने सांगितलं की, तो पहाटे चार वाजल्यापासून अभ्यासाला सुरुवात करायचा. त्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी घेऊन पुन्हा अभ्यास करायचा, हेच त्याचं दिवसभरातील नियोजन होतं. युट्यूब आणि सोशल मीडियावरील लेक्चर्स पाहून परीक्षेची तयारी केल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com