Success Story : शेतकऱ्याचा मुलगा ठरला युवकांसाठी आयडॉल, वाचा जितेंद्र वर्मा कसे झाले अधिकारी… 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील मोठी (Success Story) लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांना यातून विशेष उत्पन्नही मिळत नाही. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातूनच देशातील करोडो कुटुंबे जगतात. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही अनेकदा शेतकऱ्यांची मुले त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवतात. आज आपण अशाच एक जिद्दी तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत…

उत्तर प्रदेशचा रहिवासी (Success Story)

जितेंद्र वर्मा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौर डेव्हलपमेंट ब्लॉकमधील बेलवारिया जंगल गावातील रहिवासी आहे. त्यांचे वडील राम प्रकाश वर्मा शेती करतात. घरामध्ये अत्यंत कमी सुविधा असूनही जितेंद्र यांनी मेहनतीच्या जोरावर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे.

तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान

असं म्हटलं जातं की जर तुमचे इरादे मजबूत असतील आणि ध्येय निश्चित असेल तर यश तुमच्या पायांचे चुंबन घेते. एका शेतकऱ्याच्या मुलाने हा मुद्दा खरा करून दाखवला आहे. त्यांची जीवनगाथा लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. खडतर संघर्ष करत जितेंद्रने आपला अभ्यास (Success Story) सुरू ठेवला आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता तो उत्तर प्रदेशच्या सचिवालयात पुनरावलोकन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

असा होता शैक्षणिक प्रवास

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जितेंद्र वर्मा यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी आदर्श जनता इंटर कॉलेज हलुआ बाजार येथून हायस्कूलची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. यानंतर त्यांनी जनता इंटर (Success Story) कॉलेज बभनन गोंडा येथून इंटरमिजिएट पूर्ण केले. पदवीसाठी ते अयोध्या येथील साकेत महाविद्यालयात गेले आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बस्ती येथे राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि आता तो अधिकारी होऊन सरकारी सेवेत योगदान देणार आहे.

अभ्यासासाठी वापरले हे तंत्र

पदवी शिक्षणासाठी ते अयोध्या येथील साकेत महाविद्यालयात गेले आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बस्ती येथे राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. घरातील (Success Story) बिकट आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करत न डगमगता त्यांनी सरकारी परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला. अखेर एक दिवस त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि आता ते अधिकारी होऊन सरकारी सेवा बजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com