करिअरनामा ऑनलाईन । “मी नापास झाल्यामुळे नातेवाईक (Success Story) मला टोमणे मारायचे. मला असं सांगायचे की की UPSC नाही तर एखादी किरकोळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल. त्यानंतर मी लेखापाल आणि अमीनच्या परीक्षेला बसलो, पण इथेही मला अपयश आले. यानंतर सगळं संपल्यासारखं वाटत होतं. मनात विविध प्रकारचे विचार मनात येहे. पण यश मिळणारच ही आशा अजूनही मनात होती.” हे बोल आहेत IPS संदीप कुमार मीना यांचे.
संदीप कुमार यांनी नैराश्यावर मात करत शून्यातून सुरुवात करत 2017 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आज ते मुरादाबाद ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. नैराश्याने त्रस्त होऊन आत्महत्येचे पाऊल उचलणारे IPS संदीप कुमार यांची कहाणी तुम्हाला निश्चितच प्रेरणा देईल.
शेतकऱ्याचा मुलगा
संदीप यांनी UPSC परीक्षेत 852 वा क्रमांक मिळवला आहे. संदीप कुमार मीना हे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील जितेंद्र कुमार मीना हे शेतकरी आहेत, तर आई मीरा गृहिणी आहे. त्यांना तीन लहान बहिणी आहेत. त्यांनी दौसा येथील भगवती विद्या मंदिर शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नंतर जयपूरमध्ये राहून 11वी, 12वी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मुलानं डॉक्टर व्हावं अशी होती आई-वडिलांची इच्छा (Success Story)
संदीप कुमार मीना सांगतात की; त्यांच्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती, पण लहानपणापासूनच त्यांनी आयपीएस आणि आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. काका महेंद्रकुमार मीना दिल्लीत राहून UPSC ची तयारी करत होते. मलाही दिल्लीला जाऊन तयारी करायची होती, पण तिथे जाऊन मी माझा वेळ वाया घालवणार असे माझ्या घरच्यांना वाटले. काका, आजोबा आणि मामा यांच्या माध्यमातून मी माझ्या आई-वडिलांना UPSC परीक्षेचे महत्व पटवून दिले. यानंतर मी दिल्लीत सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली.
तणाव दूर करण्यासाठी वाचल्या मोटिव्हेशनल स्टोरी
संदीप सांगतात; “UPSC परीक्षेत मुलाखतीच्या फेरीपर्यंत चार वेळा पोहोचलेली व्यक्ती आणि तीच व्यक्ती लेखापालची परीक्षा पास करू शकत नाही? या विचाराने मी मानसिकरित्या खचून गेलो होतो. सततच्या अपयशांनी मला आतून हादरवून सोडलं. तणावाखाली जगू लागलो. मनात चुकीचे (Success Story) विचार येऊ लागले. मग मी माझ्या यशाची स्वप्ने पाहणाऱ्या माझ्या पालकांचा विचार केला आणि मनावर आलेली मरगळ झटकली. स्वतःला सतत प्रेरित ठेवण्यासाठी मी यशस्वी लोकांच्या कथा वाचत असे. मोटिव्हेशनल स्टोरी वाचल्याने मला प्रत्येक वळणावर प्रेरणा मिळत गेली.”
गंगाजल आणि सरफरोश सिनेमाचा पडला प्रभाव
जेव्हा जेव्हा मी खचत असे तेव्हा तेव्हा मी कुटुंबाचा विचार केला. मी जर काही चुकीचे पाऊल उचलले तर मला त्या लोकांना पुन्हा सांगण्याची संधी मिळेल जे माझ्या आई-वडिलांना सांगत होते की, ‘अधिकारी होण्याचे सोडा, तुमचा मुलगा शिपाई झाला तर खूप मोठी गोष्ट आहे.’ मी नेहमी यशस्वी (Success Story) लोकांच्या कथा वाचतो ज्यामुळे मला ऊर्जा मिळते. सरफरोश चित्रपटात अभिनेता आमिर खान आयपीएस अधिकारी म्हणून दाखवण्यात आला होता आणि गंगाजलमध्ये अजय देवगण आयपीएस अधिकारी म्हणून दाखवण्यात आला होता, या भूमिकांनी मला खूप प्रेरित केले.
4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात मिळाली कामयाबी
संदीप कुमार मीना सांगतात; “मी आई-वडिलांसोबत शेती केली आहे. पुस्तक घेऊन शेतात जायचो. पिकांना पाणी दिल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शेतात अभ्यास करायचो. अभ्यास (Success Story) करताना तिथेच झोपायचो. हे पाहून मुलगा खरोखरच कष्ट करत आहे यावर माझ्या पालकांचा विश्वास बसू लागला. 2013, 2014, 2015, 2016 मध्ये UPSCच्या मुलाखत फेरीसाठी पात्र ठरलो पण तिथेही अपयश आले. सततच्या अपयशाने लोक टोमणे मारत होते; पण जिद्द सोडली नाही. 2017 मध्ये झालेल्या परिक्षेत सर्व फेऱ्या पार करत मी 852 व्या क्रमांकाने पास होत IPS पद मिळवले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com