करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानच्या विजय सिंह गुर्जर यांचा UPSC चा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. या परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. विजय यांनी नेहेमी खुप मेहनत केली आणि स्वतःचे रस्ते स्वतः निर्माण करून पुढे जात राहिले. त्यांनी कॉन्स्टेबल वरून IPS पदावर पोहचून आपल्या घराचे नाव मोठे केले. सर्वात चांगली गोष्ट अशी की त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग जॉइन केले नाही. त्यांनी फक्त सेल्फ स्टडीच्या दमावर यश संपादन केले.
विजय यांचा जन्म राजस्थानच्या एका लहान खेड्यात अगदी ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. विजय यांचे वडील जास्त शिकलेले नाहीत, परंतु त्यांनी मुलांच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष दिले. त्यांना वाटत होते की, त्यांच्या मुलांचे आयुष्य चांगले आणि शिक्षणातून उत्तम व्हावे . खेड्यातल्या शाळेतून विजय यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तिथेच ते वडिलांना शेताच्या कामात मदत करत असत. विजय म्हणतात की त्यांच्या गावात नोकरदार मंडळींकडे खूप सन्मानाने बघितल जात. त्यामुळे त्यांचा कल देखील याबाजूला झुकला. त्यांनी दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलची तयारी केली आणि पास झाले. आणि ते इथेच थांबले नाहीत त्यांनी कॉन्स्टेबलच्या पुढे जाऊन सब-इंस्पेक्टरचे स्थान सुनिश्चित केले. त्यानंतर त्यांनी एसएससीची परीक्षा दिली आणि ती परीक्षा पास करून इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये एका चांगल्या पदावर काम केले.
विजय यांनी नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी चालू ठेवली. जेव्हा कधी त्यांना वेळ मिळत ते अभ्यास करत असत. वर्ष 2016 मध्ये ते इंटरव्ह्यू पर्यंत पोहचले पण ते सिलेक्ट झाले नाहीत. त्यांना त्याचा थोडा त्रास झाला पण ते हिम्मत हरले नाही आणि प्रयत्न चालू ठेवलेत. विजय यांची मेहनत शेवटी सफल झाली आणि वर्ष 2017 च्या परीक्षेत ते पास झालेत. वर्ष 2018 च्या IPS बॅचसाठी निवडलेल्या विजय यांचा प्रवास खुप मोठा होता. विजय सांगतात की आपण कोणत्या बैकग्राउंडचे आहोत याने काही फरक पडत नाही. जर आपण पूर्ण मन लावून तयारी केली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com