करिअरनामा ऑनलाईन । लोकांमध्ये एक सामान्य समज आहे की, तुम्हाला जर यूपीएससी परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर नोकरी करत असताना तयारी करणे फारच अवघड आहे. कारण, नोकरीमध्ये बराचसा वेळ गेल्यामुळे तुम्ही परीक्षेची तयारी चांगली करू शकत नाही. परंतु, काही लोकांनी फक्त पूर्णवेळ नोकरीसह परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर, टॉपर्सच्या यादीत त्यांची नावे देखील नोंदविली आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत, नोकरी करून युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मनीष कुमार यांची! मनीष यांनी यूपीएससी 2017 परीक्षेत 61 वा क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हा त्यांचा फक्त दुसरा प्रयत्न होता. चला तर मग मनिष यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
मनीष म्हणतात की, ‘जेव्हा आपण नोकरीसह या परीक्षेची तयारी करता तेव्हा, आपल्याला अधिक सकारात्मक वाटते. कारण, परीक्षेत नापास झाल्यानंतर आपल्या कारकीर्दीचे काय होईल याची आपल्याला भीती नसते. नोकरीसह यूपीएससीची तयारी करणे इतके सोपे नाही. परंतु, ते करता येते. आपल्याकडे किती वेळ आहे याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. तुमच्या जुन्या नोकरीवर कधीही टीका करु नका. मनीष यांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांचा जुन्या नोकरीबद्दल प्रश्न विचारला की, चांगली नोकरी सोडून ह्या क्षेत्रात येण्याचे कारण काय? त्यांना काहीतरी चांगले करण्याची इच्छा आहे! असे त्यांनी प्रत्युत्तरात सांगितले.
मनीष इतर उमेदवारांना सल्ला देतात की, जे नोकरी करतात त्यांनी अधिक नियोजन करुन अभ्यास करावा. सुट्टीचा दिवस अधिक वापरा. नियोजन करून सर्व काही करा. ऑफिसमधून सुट्टी मिळणे शक्य असेल तर मधे-मधे सुट्टी घेऊन अभ्यास करा. ऑफिसमध्ये वेळ मिळताच ऑडिओ ऐका किंवा नोट्स बनवा. मनीष यांचा असा विश्वास आहे की, नोकरीद्वारेही तयारी करता येते. आणि योग्य नियोजनाद्वारे यश संपादन करता येते.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com