Success Story : “मला कोणी मागे टाकलं तर माझं नाव बदला..”; असं ठणकावून सांगणारा हितेश मीना कोण आहे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षेत (Success Story) यश मिळवलेल्या प्रत्येक उमेदवाराची स्वतःची संघर्षाची कहाणी असते. हितेश मीना हे यापैकीच एक आहेत. त्यांनी UPSC परीक्षेत भरघोस असे यश संपादन केले आहे. हितेश मीना हे त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांसाठी ओळखले जातात. हितेश मीना (IAS Hitesh Meena) म्हणाले होते, “मला पुस्तक सांगा, परीक्षा कधी आहे ते सांगा, यानंतर मला कोणी मागे टाकलं तर माझं नाव बदला.” स्वतःबद्दलचा एवढा आत्मविश्वास निश्चितच वाखणण्याजोगा आहे. हितेश जे बोलले ते त्यांनी करूनच दाखवलं. कोण आहेत हितेश मीना? जाणून घेवूया…

सामान्य कुटुंबातील मुलगा
हितेश मीना हे राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील गधौली गावचे आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी सामान्य आहे. त्यांचे अजोबा शेती करायचे. वडील शिक्षक असून आई सर्व (Success Story) सामान्य गृहिणी आहे. हितेश यांनी 2016, 2017 आणि 2018 मध्ये UPSC CSE परीक्षा दिली. 2016, 2017 मध्ये प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुलाखतीसाठी हजर राहिले पण तिथे त्यांना अपयश आलं. 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा आणि IoFS या दोन्हींच्या मुलाखतींमध्ये ते दिसले. या दोन्ही परीक्षा ते पास झाले.

…. तर माझं नाव बदला (Success Story)
आजची यशोगाथा हितेश मीना यांची आहे; जे UPSC CSE 2018 पास होऊन IAS अधिकारी झाले आहेत. हितेश मीना यांनी तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. हितेश मीना हे त्याच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांसाठी ओळखले जातात. हितेश मीना यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, “मला पुस्तक सांगा, परीक्षा कधी आहे, मला किती अभ्यास करायचा आहे. यानंतर मला कोणी मागे टाकले तर माझे नाव बदला.”

उच्च शिक्षित आहेत हितेश
हितेश मीना हे मूळचे राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील गधौली गावचे आहेत. त्यांनी तिथल्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाजगी (Success Story) शाळेतून घेतले तर बी. एच. यू. वाराणसीमधून बी. टेक. आणि आयआयटी दिल्लीमधून एम. टेक. केले. यानंतर त्यांनी 2016, 2017 आणि 2018 मध्ये UPSC CSE परीक्षा दिली. 2016, 2017 मध्ये प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी हजर झाले. 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा आणि IoFS या दोन्हींच्या मुलाखतींमध्ये ते दिसले.

तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश (Success Story)
सलग दोन वेळा अपयश आल्यानंतरही हितेश डगमगले नाहीत. 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 417 वा क्रमांक मिळवला. यावेळी त्यांनी 977 गुण मिळवले. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2018 मध्ये त्यांना हरियाणा केडर मिळाले. एक वर्षाच्या शैक्षणिक प्रशिक्षणानंतर त्यांना पहिली पोस्टिंग गुडगावला मिळाली. त्यांची पत्नी देखील त्यांच्या बॅचची IAS आहे, त्यांची पोस्टिंग कलकत्ता येथे झाली आहे.

भारतीय वन सेवा परीक्षा केली पास
हितेश मीना भारतीय वन सेवा परीक्षा 2018 (IFoS) मध्ये देखील यशस्वी झाले आहेत. IAS हितेश कुमार मीनाचा विवाह IAS रेणू सोगनशी (IAS Renu Sogan) झाला आहे, ती 2019 बॅचची अधिकारी आहे. हितेश कुमार मीना हे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा शेतकरी होते आणि वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. त्यांनी B.Tech फायनलमध्ये असताना IAS होण्याचा निर्धार केला आणि तो आत्मविश्वासाने पूर्ण करून दाखवला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com