करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी करूनच करिअर (Success Story) करता येतं असं नाही. अनेक तरुण तरुणी नोकरी न करता व्यवसाय करणं पसंत करतात. काहीजण असेही आहेत जे चांगली नोकरी सोडून वेगळा उद्योग-व्यवसाय करण्यास पसंती देतात. आज आपण अशाच एका धाडसी महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलेनं चक्क नोकरी सोडून स्कूल बसमध्ये राहणं सुरु केलं आहे. ही महिला जेवढे पैसे पगारातून मिळवत होते त्याच्या दुप्पट पैसे आता कमावत आहे. ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen) असं या महिलेचं नाव आहे.
नोकरी सोडून राहण्यासाठी बस घेतली (Success Story)
ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen) असं या महिलेचं नाव आहे. ही 32 वर्षीय तरुणी अमेरिकेची रहिवासी आहे. आज आपण या महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. या महिलेने नोकरी सोडून राहण्यासाठी बस घेतली आणि दूरवर प्रवास करुन ही महिला जिद्दीने करोडो रुपये कमावत आहे.
नोकरी सोडल्यानंतर आता पुढं काय?
ॲलिस एव्हरडीन यांनी 2020 मध्ये ऑस्टिनमध्ये एका सप्लिमेंट कंपनीत काम केले होते. पण या कामाला त्या कंटाळल्या होत्या. पगार चांगला मिळत होता पण या कंपनीत त्यांना (Success Story) जास्त वेळ काम करावे लागत होते. त्यामुळं त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर आता पुढं काय करायचं? असा विचार त्यांच्या मनात आला. यावेळी त्यांनी एक स्कूल व्हॅन विकत घेतली आणि त्या व्हॅनमध्येच राहू लागल्या.
फ्रीलान्सिंग करुन करोडो कमावते
नोकरी सोडल्यानंतर उपजिविकेचे साधन शोधत असताना त्यांनी एक स्कूल व्हॅन विकत घेतली होती. या व्हॅनमधून सध्या त्या संपूर्ण देशात फिरत आहेत. या प्रवासात ॲलिस एव्हरडीन यांच्यासोबत (Success Story) त्यांचे पती आणि एक पाळीव कुत्रा असतो. या प्रवासात त्या कंटेन्ट मॅनेजर म्हणून काम करतात. तसेच वेगवेगळे व्हिडीओ देखील तयार करतात. हा सगळा खटाटोप करत असताना फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून ॲलिस एव्हरडीन 1 कोटींहून अधिक कमाई करतात.
नामांकित कंपन्यांसाठी केलं फ्रीलांसिंग
ॲलिस एव्हरडीन यांना पूर्वी नोकरी करुन जेवढे पैसे मिळत होते, त्याच्या दुप्पट पैसे आता मिळत आहेत. ॲलिस एव्हरडीन या व्हाईस ओव्हरचं काम करण्याबरोबर त्या कंटेन्ट तयार करणं, अनेक वेगवेगळ्या (Success Story) प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याचं देखील काम करतात. यातून त्यांना मोठा पैसा मिळतो. याचबरोबर विविध ठिकाणची माहिती देखील त्यांना मिळते. ॲलिस ‘Fiverr’ सारख्या नामांकित कंपन्यांसाठी फ्रीलांसिंगचे काम देखील करत आहेत.
घरपेक्षा बस स्वस्त
ॲलिस एव्हरडीन यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्या सांगतात शाळेच्या बसमध्ये (School Bus) राहणं खूप स्वस्त आहे. त्यापेक्षा घरात राहण्याचा खर्च जास्त आहे. बसमध्ये फक्त खाण्याचा आणि पार्किंगचा खर्च होतो. कॅम्प ग्राउंडमध्ये बस पार्किंगसाठी 3 ते 6 हजार रुपयांचा खर्च येतो. तर सार्वजनिक ठिकाणी बस पार्किंग करण्यासाठी काहीही खर्च येत नाही. पेट्रोलसाठी महिन्याला एकूण 80 हजार रुपये तर जेवणासाठी महिन्याला 20 ते 40 हजार रुपये खर्च होतो; अशी माहिती ॲलिस एव्हरडीन यांनी दिली. ॲलिस त्यांच्या इंस्टाग्राम पेज (Instagram) @lifestooshortbus वर या प्रवासाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com