यशोगाथा: बिहारच्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब कुटुंबातील दिव्या बनली आयएएस; जाणून घ्या तिचा सक्सेस मंत्रा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बिहारमधील दिव्या शक्ती यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या सीएसई 2019 परीक्षेत 79 वा क्रमांक मिळवत यादीमध्ये स्थान पटकावले. तथापि, याला दिव्या यांचा पहिला प्रयत्न देखील म्हटले जाऊ शकते. कारण त्यांनी कोणतीही तयारी न करता पहिला प्रयत्न केला, तो फक्त परीक्षेविषयी जाणून घेण्यासाठी. दिव्या सांगतात की, बर्‍याच वेळानंतर त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायचे हे ठरवले. त्यानंतर त्यांनी तयारी सुरू केली.

दिव्या यांनी बिट्स पिलानी येथून बीटेक केले आहे. यानंतर त्यांनी अर्थशास्त्र विषयात मास्टर्स केले. यानंतर त्यांना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पण या नोकरीत त्यांच मन लागत नव्हते. त्यांचे काही वरिष्ठ युपीएससी परीक्षेची तयारी करत होते. अशा परिस्थितीत यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची कल्पना त्यांच्या मनातही आली. यूपीएससी करायचे की नाही हे ठरविण्यात त्यांना बराच काळ लागला. दिव्या इतर उमेदवारांनाही त्यांच्या लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. दिव्या यांनी वर्षभर विविध परीक्षा दिल्या. जेणेकरुन त्यांना माहित व्हावे की, त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचे आहे. स्वतःसाठी योग्य मार्ग निवडण्यासाठी त्यांनी सुमारे एक वर्षाचा वेळ घेतला.

एखाद्याकडे बघून किंवा त्याच्या प्रभावाला पाहून निर्णय घेऊ नका. या परीक्षेची सर्व माहिती त्यांनी प्रथम गोळा केली. वर्षभर गंभीर तयारीनंतरच दिव्या यांनी यश संपादन केले. दिव्या म्हणतात की यूपीएससीमधील दिलेल्या विषयांपैकी जर तुम्ही काही विषयात थोडे गोंधळात पडलात तर त्या विषयांची एनसीईआरटीची पुस्तके वाचा. पर्यायी विषयाची निवड काळजीपूर्वक करा. त्यांच्या तयारी दरम्यान दिव्या यांनी बरेच व्हिडिओ पाहिले. त्या म्हणतात की, आपण ही परीक्षा नोकरी करूनही उत्तीर्ण होऊ शकता. परंतु ते त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून असते.